ETV Bharat / state

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! महाविद्यालयातच मिळणार आता वाहन परवाना - vehicle license get in college

वाहन परवाना विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातच मिळणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना महाविद्यालयात परवाना मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

परिवहन मंत्री दिवाकर रावते
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:43 PM IST

Updated : Aug 14, 2019, 11:57 PM IST

हिंगोली - वाहन परवाना विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातच मिळणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना महाविद्यालयात परवाना मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. हिंगोलीत परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आज हिंगोलीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते लिंबाळा भागातील साडे पाच कोटी रुपये खर्चून बनविलेल्या परिवहन कार्यालयाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी रावते यांनी या इमारतीतून चांगल्यात-चांगली कामे होतील आणि सर्वसामान्यांची अजिबात हेळसांड होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. नेहमीच या भागात दलालांचा देखील सुळसुळाट होत असल्याची चर्चा जोरात सुरू असते. मात्र, आता तसे अजिबात होणार नाही. येथे येणाऱ्यांची कामे वेळेत कशी होतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, एवढेच नव्हे तर कामे वेळेत पूर्ण करण्याचे देखील नियोजन असेल, असे रावते म्हणाले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर..! महाविद्यालयातच मिळणार आता वाहन परवाना

पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहनाचा परवाना काढण्यासाठी कार्यालयामध्ये खूपवेळा खेटे घालावे लागत होते. यामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांचे शिक्षणही अधुरे राहत होते. याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता. मात्र, आता अजिबात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, कारण ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे. त्याच महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांचा वाहन परवाना देखील काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी त्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज घेत त्यांना वाहन परवाना देतील, अशी व्यवस्था भविष्यात केली जाईल.

तसेच महिलांसाठी वाहन भरती प्रक्रियाही केली जाणार आहे. पूर्वी सहायक परिवहन अधिकाऱ्यांसाठी अनुभव प्रमाण पत्र लागत होते ते मात्र आता रद्द केल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले. सध्या रस्ते अपघातात दुचकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुचाकी स्वाराने हेल्मेटचा सर्वाधिक वापर करावा. आदिवासी महिलांना चालक म्हणून नेमले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात मनुष्यबळ देखील पुरविले जाईल. त्यामुळे कामाला आपसूकच वेग येईल, असे ते म्हणाले.

Intro:पूर्वी वाहन परवाना म्हटलं की वाहनधारकांची डोकेदुखी वाढत होती एवढेच नव्हे तर परिवहन कार्यालयात खेटे मारो मारो अनेकांच्या नाकी नऊ त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वाहन परवाने काढण्यासाठी तर एवढी हेळसांड होत होती विचारताच गलत नाही मात्र आता त्या त्या महाविद्यालयातच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची परिवहन कार्यालयात परवाना काढण्यासाठी खेटे घेण्याची वेळ भविष्यात तूर्तास टळण्यास मदत होणार असल्याचे आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हिंगोलीत परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

Body:आज हिंगोली येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते लिंबाळा भागातील साडे पाच कोटी रुपये खर्चून बनविलेल्या परिवहन कार्यालयाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी मंत्री यांनी या इमारतीतुन चांगल्यात चांगले कामे होतील अन सर्वसामान्यांची अजिबात हेळसांड होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. तर नेहमीच या भागात दलालांचा देखील सुळसुळाट होत असल्याची चर्चा जोरासोरात सुरू राहत असते. मात्र आता तसे अजिबात होणार नाही. कारण या येथे येणाऱ्यांची कामे वेळेत कशी होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जाईल, एवढेच नव्हे तर ते वेळेत पूर्ण करण्याचे देखील नियोजन असेल. पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहनांचा परवाना काढण्यासाठी या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेटे घ्यावे लागत होते यामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांचे शिक्षणही अधुरे राहात होते याचा विद्यार्थ्यांना नाकच त्रास देखील सहन करावा लागत होता. मात्र आता अजिबात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही कारण ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे त्याच महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांचा वाहन परवाना देखील काढून देण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिवहन कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी त्या महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज घेत त्यांना वाहन परवाना दिला भविष्यात जाईल. तसेच महिलासाठी वाहन भरती प्रक्रिया ही केली जाणार आहे. अन पूर्वी सहायक परिवहन अधिकाऱ्यांसाठी अनुभव प्रमाण पत्र लागत होते ते मात्र आता रद्द केल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले. सध्या रोड अपघातात दुचकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुचाकी स्वराने हेल्मेटचा सर्वाधिक वापर करावे, जने करून मृत्यूला आळा बसेल. आदिवासी महिलांना चालक म्हणून नेमले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात मनुष्यबळ देखील पुरविले जाईल. त्यामुळे कामाला आपसूकच वेग येईल.

Conclusion:तसेच आता वाहनां संदर्भात सर्वच कामे थेट कार्यालयातुन केले जातील, कोणत्याही दलाला जवळ अजिबात जाण्याची गरज राहणार नाही. यावेळे मोठ्या संख्येने लोकनेत्यांचा व पोलीस अधिकाऱ्यांचा लवाजमा उपस्थितत होता.

व्हिज्युअल ftp केलेत बातमीत वापरणे
Last Updated : Aug 14, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.