ETV Bharat / state

हिंगोलीत संचारबंदी दरम्यान पत्रकार - पोलिसात चकमक, पत्रकार बेशुद्ध तर पोलिस अधिकारी गंभीर जखमी - latest hingoli news

हिंगोली येथे संचारबंदी दरम्यान पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये पत्रकार यांच्या पाठीवर तर पोलीस अधिकारी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

हिंगोली
हिंगोली
author img

By

Published : Mar 29, 2020, 6:32 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे संचारबंदी दरम्यान पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये पत्रकार यांच्या पाठीवर तर पोलीस अधिकारी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. दोघांवरही हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोली

कन्हैया खंडेलवाल पत्रकार, तर सहायक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर असे जखमी अधिकाऱ्यांचे नाव आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते. पत्रकार खंडेलवाल आणि सपोनि चिंचोळकर यांच्यात अचानक शाब्दिक वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीचे नेमके कारण काय? हे अद्याप तरी कळू शकले नाही.

मात्र, या घटनेत पत्रकार खंडेलवाल हा बेशुद्ध झाला. त्याला तशाच अवस्थेत रुग्णालयात हलविले, तर सपोनि चिंचोळकर यांच्याही डोक्याला गंभीर मार लागला आहे. सध्या दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली.

रुग्णालयात असलेल्या दोघाही जखमींची पोलीस अधिकारी व पत्रकारांनी भेट घेतली. पत्रकार आणि पोलीस यांच्यात मारहाण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्वसामान्यांना मारहाण न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.