हिंगोली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र निवडणुक विभाग बारकाईने लक्ष ठेऊन आहे. संशयित वाहनांची चेकपोस्टवर तपासणी केली जात आहे. शनिवारी निवडणुक पथकाने 20 लाख तीन हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याचे पोनी सरदारसिंह ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - 'अभी तो मै जवान हूँ'.... शरद पवारांची टोलेबाजी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुक विभाग आणि पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात सतर्क झाले आहे. या कालावधीत उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या भेट वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात आमिष दाखवण्याची शक्यता असल्याने, निवडणुक विभाग आणि पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. जिल्ह्यात सर्वत्र लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शनिवारी सेनगाव तालुक्यातील वाढोना येथे चेकपोस्टवर एका दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवरून 20 लाख 3 हजार रुपयांची रोकड जप्त केली. मात्र, रक्कम एका बँकेची असल्याचे समोर आले. मात्र,रक्कम नेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी लागते. अशी परवानगी नसल्याने ही रक्कम दुचाकीसह जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम सेनगाव येथील अकोला जनता कॉमेरीकल को अपरेटिव्ह बँक मध्ये जात होती. मात्र, ही रक्कम पोहोचवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी नसल्याची माहिती पोनी ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींच्या १५ सभा