ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; प्रवासी वाहणारे चारचाकी चालक आर्थिक संकटात

नेहमीच प्रवाशांनी गजबजून जाणारी वाहने आता लॉकडाऊनमुळे बंद पडली आहेत. त्यामुळे अशा वाहनांचा आजघडीला हळदीचा कोचा घेऊन जाण्यासाठी उपयोग करण्याची दुर्दैवी वेळ वाहनधारकांवर येऊन ठेपली आहे.

author img

By

Published : May 30, 2020, 6:31 PM IST

हिंगोली - यंदा प्रत्येक व्यावसायिकाला कोरोनाचा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार गेले असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. यामधून खासगी वाहनधारकदेखील सुटलेले नाहीत. नेहमीच प्रवाशांनी गजबजून जाणारी वाहने आता लॉकडाऊनमुळे बंद पडली आहेत. त्यामुळे अशा वाहनांचा आजघडीला हळदीचा कोचा घेऊन जाण्यासाठी उपयोग करण्याची दुर्दैवी वेळ वाहनधारकांवर येऊन ठेपली आहे.

कोरोनाने सर्वांनाच हादरून सोडले आहे. मोठमोठ्या कंपन्या, लघू उद्योग बंद पडले असून अनेक कामगारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कोरोनाचा प्रत्येकाला फटका बसला आहे. यामध्ये सर्वच जण अडकले असून खासगी वाहनधारकांच्यादेखील मानगुटीवर हा कोरोना बसला आहे.अशाच अडचणीत सापडलाय हा सेनगाव तालुक्यातील अजेंगाव येथील एक खासगी वाहनधारक. गजानन गोरे असे या वाहनधारकांचे नाव आहे. गजानन यांनी उभं आयुष्य दुसऱ्याच्या गाड्या चालवण्यामध्ये घातलं. पै पै जमा करून फायनान्सवर एक क्रूझर गाडी घेतली. येथून शहरी ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन किंवा बसशिवाय पर्यायच नसल्याने, गजानन यांच्या गाडीला खूप मागणी. त्यामुळे याच पैशावर गजानन यांनी एक ऑटो, पीकअप अशी वाहने फायनान्सवरच खरेदी केली आहेत.

व्यवसायदेखील जोरात होता. फेब्रुवारी-मे हे तर गजानन यांच्या कामासाठी महत्त्वाचा काळ. मात्र, यावर्षी कोरोना आला आणि सर्व काही अघटीत घडलं. लॉकडाऊन करण्यात आल्याने वाहतूक सेवा, लग्नकार्य, सामाजिक, धार्मिक कार्य पूर्णपणे बंद असल्याने गजानन यांच्या वाहनाचा चक्का जाम झाला आहे. एखादे प्रवासी बाहेर नेले किंवा आणले तर 15-15 दिवस अलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून वाहने जागचे हलविलेले नाहीत. वाहनांचा चक्काच न फिरल्याने त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकलाय तो फायनान्सवर घेतलेल्या वाहनांचे हप्ते फेडण्याचा. त्यामुळे गजानन यांनी शेवटी प्रवासी वाहून नेणारी क्रूझर गाडी हळद वाहन्याच्या उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे. ही वेळ केवळ एकट्या गजानन यांच्यावरच आलेली नाही तर असे कित्येक गजानन या लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.