ETV Bharat / state

Bus-Truck Accident in Hingoli : खासगी बस-ट्रकचा अपघात, बसमधील तिघांचा जागीच मृत्यू - bus and truck accident hingoli

नांदेडकडून हिंगोली मार्गे प्रवास करीत असलेल्या खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ( Bus-Truck Accident in Hingoli ) या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Bus-Truck Accident in Hingoli
खासगी बस-ट्रकचा अपघात
author img

By

Published : Dec 30, 2021, 1:40 AM IST

Updated : Dec 30, 2021, 2:22 AM IST

हिंगोली - नांदेडकडून हिंगोलीमार्गे प्रवास करीत असलेल्या खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ( Bus-Truck Accident in Hingoli ) या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील पारडी मोड फाट्यावर घडली. यात जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनास्थळाची दृश्ये

बसमधील लोकांची विनवणी -

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. नांदेड येथून एमएच 38 एफ 8485 या क्रमांकाची खासगी बस प्रवासी घेऊन हिंगोलीमार्गे निघाली होती. दरम्यान, पारडी मोड येथे नांदेडमार्गे जाणाऱ्या एका कंटेनरची आणि या बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयंकर होती की, बसच्या कॅबिनमध्ये बसलेले प्रवासी थेट बसच्या फुटलेल्या काचेतून, बाहेर फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली तर काही, प्रवासी रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. त्यामुळे तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अजून दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. 'अहो मला वाचवा, मी जिवंत आहे, माझा पाय अडकला, माझा हात मोडला, या शब्दात या अपघातातील मृत्यू डोळ्याने पाहत असलेल्यांनी विनवणी केली.

हेही वाचा - Two Died in Road Accident : अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, यवतमाळच्या पांढरकवडा येथील दुर्घटना

जेसीबीच्या सहाय्याने काढले मृतदेह -

अपघात घडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या अपघाताची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना कळवली. यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे, यांच्यासह कळमनुरी पोलीस ठाण्याचे देखील पथक दाखल झाले.

ग्रामस्थांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तर ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. यामध्ये दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक महिला ट्रकमध्ये अडकलेली होती. या अपघातात चूक नेमकी कोणत्या वाहनाची आहे? हे अजून कळू शकले नाही. तसेच याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Last Updated : Dec 30, 2021, 2:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.