ETV Bharat / state

कोरोनाचा कहर...बसचालकाला कामावर बोलवत नसल्याने फळविक्री करण्याची वेळ - हिंगोली बसचालक झाला फळविक्रेता

गोलीतील एका बस चालकानं कामावर बोलावण्यात येत नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी, स्टेरिंग धरणाऱ्या हाताने केळी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. फळ विक्री करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न हा बस चालक करीत आहे.

bus-driver-is-selling-fruit-due-to-lack-of-money-in-this-covid-pandemic-in-hingoli
बसचालकाला कामावर बोलवत नसल्याने फळविक्री करण्याची वेळ
author img

By

Published : Jul 28, 2020, 12:13 PM IST

हिंगोली - कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहे. अशा काळात हिंगोलीतील एका बस चालकानं कामावर बोलावण्यात येत नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी, स्टेरिंग धरणाऱ्या हाताने केळी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. फळ विक्री करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न हा बस चालक करीत आहे. तर दुसऱ्या एका मृत चालकाच्या पत्नीने देखील घरसंसार चालविण्यासाठी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

मारोती नेमाने (रा. संतुक पिंपरी) असे या बस चालकाचे नाव आहे. नेमाने हे 1999 पासून हिंगोली येथील एस टी महामंडळमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नोकरीवर घर चालत होते. आधीच तुटपुंज्या पैशावर काटकसरीने संसार करणाऱ्या मारोती नेमाने यांच्यावर कोरोनामुळे घरी बसण्याची वेळ आली. हिंगोली येथील आगारात दिडशेच्यावर चालक, वाहक, कर्मचारी असून आहेत. मात्र, कोरोनामुळे आगारातील मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. फक्त गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून, त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. या धोरणामुळे कामावरून बंद केलेल्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ पगारावर अवलंबून असलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी उसनवारी करून संसाराचा गाडा हकण्यास सुरूवात केली आहे. त्यापैकीच एक बस चालक संघटनेचे अध्यक्ष मारोती नेमाने यांनी फळ विक्रीचा गाडा लावण्यास सुरुवात केली आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून ते घर चालवतात.

बसचालकाला कामावर बोलवत नसल्याने फळविक्री करण्याची वेळ
नेमाने यांचे गाव हिंगोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. फळ विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून घरी लागणारे साहित्य किंवा अन्न धान्य घेऊन जात असल्याचे नेमाने यांनी सांगितले. नेमाने यांच्या पत्नी आजारी असल्यामुळे त्यांना नेहमीच औषधांचा खर्च लागतो. त्यामुळे हा खर्च भागवायचा कसा? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. त्यामुळे आपण हा व्यवसाय निवडल्याचे ते सांगतात. ही परिस्थिती केवळ नेमाने यांची एकट्यांची नाही. तर इतर अनेक कर्मचाऱ्यांची हीच अवस्था आहे.मालवाहू ट्रक वरील चालकांचे होत आहेत प्रचंड हाल- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी नसल्याने संपूर्ण बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. यावर पर्याय म्हणून आगार विभागाने बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून मालाची ने-आण सुरू केली आहे. यातून काही प्रमाणात आगाराला उत्पन्न तर मिळत आहे. मात्र, दिवस-रात्र राबणाऱ्या चालकांच्या खाण्यापिण्याचा खर्चही आगार उचलत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. याबाबतीत कुठे बोलल्यास चालकांना कामावरून कमी करण्याचीही धमकी दिली जात आहे. त्यामुळे बरेच चालक हे भीतीपोटी स्वतःवर होणारा अन्याय सहन करीत आहे. एवढेच नव्हे तर जेवणाचा तर कधी गाडी पंक्चर झाल्यास त्यासाठी पैसेही सोबत दिले जात नसल्याची खंत एका चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.