ETV Bharat / state

हिंगोलीत झाडू विक्रीची परवानगी; विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण - हिंगोलीत झाडू विक्रेत्यांना व्यवसायाची परवानगी

कोरोनामुळे गेल्या ८ महिन्यांपासून हतबल झालेल्या लघु व्यावसायिकांना दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पाचही तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती जागा उपलब्ध करून दिल्याने, व्यापाऱ्यांनी हिंगोली प्रशासनाचे आभार मानले आहेत.

broom sellers
झाडू विक्रेते
author img

By

Published : Nov 12, 2020, 2:21 PM IST

हिंगोली - गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे सैरभैर झालेल्या लघु व्यावसायिकांना दिवाळीच्या तोंडावर व्यवसाय करण्याची शंभर टक्के मुभा दिल्याने आनंदाचे वातावरण आहे. लक्ष्मी पूजनासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या झाडूला मागणी असल्याने झाडू विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. झाडुंची खरेदी वाढल्यामुळे आता आमची दिवाळी चांगली होणार असल्याचे एका झाडू विक्रेत्या महिलेने सांगितले.

मंगल अशोक खंदारे यांचा झाडू, दुरडी विणून बाजारात विकण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. याच व्यवसायावर संसाराचा गाडा हाकला जात आहे. कोरोना काळात मंगलबाई यांच्यासह कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे या कुटुंबावर फार वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. घरखर्चाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले होते. मात्र, दिवाळीच्या तोंडावर झाडूला मागणी वाढल्याने, मंगलबाई यांच्या चेऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला.

लघु व्यवसायिकांनी प्रशासनाचे मानले आभार -
कोरोनामुळे गेल्या ८ महिन्यांपासून हतबल झालेल्या लघु व्यावसायिकांना दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पाचही तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्याने, व्यापाऱ्यांनी हिंगोली प्रशासनाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा - दिवाळीत चीनी लायटिंगचाच बोलबाला, देशी लायटिंगपेक्षा तीनपट विक्री

खरेदीसाठी बजारपेठेत गर्दी उसळली -
हिंदू धर्मियांमध्ये दिवाळी सण सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या सणासाठी महिनाभरापूर्वीच तयारी सुरू केली जाते. एवढेच नव्हे तर दिवाळीसाठी खरेदी करण्याचेही नियोजन बारकाईने केले जाते. तेच नियोजन पूर्णत्वास नेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये मोजक्याच नागरिकांच्या चेहर्‍याला मास्क दिसत आहे. तसेच सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
पोलिसांचा कारवाईचा सपाटा -
हिंगोलीसह सर्वच तालुक्यांमध्ये दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. या ऑनलाइन चालानच्या भीतीपोटी नागरिक काळजी घेताना दिसत आहेत.

रेडिमेट पणत्याला वाढली मागणी -

पूर्वीच्या मातीच्या पणत्यांची जागा आता रेडीमेड पणत्यांनी घेतली आहे. बाजारात रेडीमेड पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. प्लास्टिकची खेळणी आणि दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

हेही वाचा -दिवाळी निमित्त वसई-विरार शहरातील बाजारपेठा सजल्या; मात्र ग्राकांचा थंड प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.