हिंगोली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान देशात होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. हिंगोली मतदारसंघातही १८ एप्रिलला मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मतदारांना मतदान करण्याच आवाहन केलं आहे.
मंगळवारी या १० मतदारसंघातील प्रचाराचा शेवटचा दिवस होता. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या १८ एप्रिलला मददान होणार आहे. दरम्यान जयवंशी म्हणाले की प्रत्येक मतदाराने मतदान करणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे असेही ते म्हणाले. प्रलोभनाला किंवा कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करा असे त्यांनी सांगितले.