हिंगोली- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांततर राष्ट्रवादीकडून राज्यभरात पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहेत. हिंगोलीतही आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारुन संताप व्यक्त करण्यात आला. तसेच पडळकर यांनी माफी मागितली नाही तर यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले.
हिंगोलीत पडळकरांच्या प्रतिकात्मक फोटोला 'जोडे मारो' आंदोलन भाजपचे विधानपरिषदचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर 'शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना' अशा शब्दात टीका केली होती. या टिकेनंतर आमदार पडळकर यांच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून आज हिंगोलीत पडळकरांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बालाजी घुगे, बि. डी. बांगर, माधव कोरडे, कमलेश यादव, आमित काळासरे आदी उपस्थित होते.हेही वाचा- पडळकरांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक, भाजप कार्यालयासमोरच आंदोलन