ETV Bharat / state

हिंगोलीहून अहमदनगरकडे जाणाऱ्या खासगी बसची दोन्ही चाके निखळली; सुदैवाने जीवित हानी नाही - hingoli news

हिंगोलीहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अपघात झाला. मागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून गेल्याने बस चाळीस ते पन्नास फूट घासत गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

hingoli
hingoli-nagar highway
author img

By

Published : Dec 4, 2019, 1:03 PM IST

हिंगोली - हिंगोलीहून अहमदनगर नगर येथे विवाह समारंभासाठी निघालेल्या बसला अपघात झाला. मागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून गेल्याने बस चाळीस ते पन्नास फूट घासत गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल चोरमारे यांचा 1 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे विवाह होता. त्या विवाहासाठी हिंगोलीहून चोरमारे यांची मित्रमंडळी व काही महसूलचे कर्मचारी खासगी वाहनाने अहमदनगर मार्गे रवाना झाले होते. त्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीची चाके जालना-औरंगाबाद महामार्गावरील रामनगर निखळली. मात्र, बस चालकाच्या सतर्कतेमुळे बस चाळीस ते पन्नास फूट गेल्यावरही थांबवता आली.

बस घासल्यामुळे आत बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन्हीही चाके 400 ते 500 फूट लांब जाऊन पडली. सुदैवाने ह्या निखळून पडलेल्या चाकांमुळे दुसऱ्या गाडीचा अपघात झाला नाही. सुदैवाने जीवित हानी टळलीही असली तरी, प्रवासाला निघण्यागोदरच गाड्यांची देखभाल ही अतिबारकाईने करणे गरजेचे असल्याचेच या घटनेवरून समोर येत आहे.

Intro:

हिंगोली- लांब पल्याचा प्रवास म्हटलं की, आपसूकच खाजगी वाहनाकडे लक्ष जाते, एवढेच काय तर लग्नसराईत तर या वाहन चालकांची एवढी चांदी असते की, यांच्या शिवाय पर्यायच नसल्याने अवाच्या सवा तिकीट दर आकारतात. मात्र प्रवाशांच्या घाई घाईत वाहनांची देखभालीकडे दुर्लक्ष केले जातेय. याचा फटका हिंगोली येथून अहमदनगर नगर येथे विवाह समारंभासाठी निघालेल्या महसुलाच्या कर्मचाऱ्यांना बसलाय. वाहनाचे मागील डाव्या बाजूचे दोन्ही चक्के निखळून गेल्याने बस चाळीस ते पन्नास फूट घासत गेली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Body:हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल चोरमारे यांचा 1 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे विवाह समारंभ होता. त्या विवाहासाठी हिंगोली येथुन चोरमारे यांचे मित्रमंडळी व काही महसूलचे कर्मचारी खाजगी वाहनाने अहमदनगर मार्गे रवाना झाले होते. महसूल चे अधिकारी व तलाठी घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलचे चालू मध्येच जालना - औरंगाबाद महामार्गावरील रामनगर येथे पाठीमागील एका बाजूचे दोन्ही ही चाक निखळले. बस चालकाच्या सतर्कते मुळे बस चाळीस ते पन्नास फूट जाऊन थांबली. Conclusion:बस घासल्या मुळे आत बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही ही चाके 400 ते 500फूट लांब जाऊन पडले. सुदैवानं हे निखळून पडलेल्या चक्यामुळे दुसऱ्या ही गाडीचा अपघात झाला नाही. बस रस्त्याच्या मधोमध उभी करून, घटनास्थळी मेकॅनिकल ला पाचारण करून, बस पुढे रवाना झाली. सुदैवाने जीवित हानी टळली ही असली तरी, जाग्यावरून निघण्यागोदरच लांबपल्याच्या बसची देखभाल ही अतिबारकाईने करणे गरजेचे असल्याचेच या घटनेवरून समोर येतेय. जरा ही दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम हा काय होते ही पोच पावती या घटनेतून मिळतेय. कारण बस चे घासत गेल्याचे अंतर पाहणाऱ्याला ही अंगावर काटा येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.