ETV Bharat / state

नांदेड-कळमनुरी मार्गावर दुचाकीची निलगायीला धडक.. दुचाकीस्वार व निलगाय दोघेही जागीच ठार - निलगाय अन् दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वारासह निलगाय जागीच ठार

नांदेड-कळमनुरी रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरासह निलगायीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

डॉ. विजय कदम
author img

By

Published : Nov 15, 2019, 10:42 AM IST

हिंगोली - नांदेड-कळमनुरी रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरासह निलगायीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

डॉ. विजय कदम (राहणार हिंगणी ता. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे. कदम हे आपल्या (एमएच 38, 7904 या क्रमांकाच्या दुचाकीने हिंगोलीकडून कळमनुरी मार्गे जात होते. खानापूर चित्ता या गावापासून काही अंतरावर रस्ता पार करत असलेल्या निलगायीची दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या डॉ. कदम यांना जोराची धकड बसली. यामध्ये त्यांच्या छातीत निलगायीचे डोके जोराने लागले अन् लांब फेकले गेले.

डोके रस्त्यावर आदळल्याने कदम यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. घटनास्थळी खूप गर्दी झाली. त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता काही वेळात रुग्नवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच निलगायचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -शाळकरी मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार; नराधम गजाआड

Intro:
हिंगोली- नांदेड - कळमनुरी रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरासह निलगायीचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात च्या सुमारास घडलीय. घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने हा अपघात किती भयंकर झाला असावा याचे तर्क वितर्क लावले जात आहेत.

Body:डॉ. विजय कदम रा. हिंगणी ता. कळमनुरी अस मयताच नाव आहे. डॉ. कदम हे आपल्या एम. एच. 38, 7904 या क्रमांकाच्या दुचाकीने हिंगोलीकडून कळमनुरी मार्गे जात होते. खानापूर चित्ता या गावापासून काही अंतरावर रस्ता पार करत असलेल्या निलगायीची दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या डॉ.कदम यांना जोराची धकड बसली. या मध्ये डॉ. यांच्या छातीत निगायीचे डोके जोराने लागले अन नीलगाय रस्त्यावर जाऊन पडली. तर डॉ. कदम हे 20 ते 25 फूट अंतरावर गेले अन जोराने रस्त्यावर आदळले. अंगावर दुचाकी अन डोके रस्त्यावर आदळल्याने डोक्यातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला होता. घटनास्थळी एकच गर्दी झाली. नागरिकांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता काही वेळात रुगवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी कदम यांना जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले असता, डॉक्टराने तपासून मयत घोषित केले. तर घटनास्थळी जखमी अवस्थेत पडलेल्या निलगायीच्याही तोंडातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होत होता. तडपत असलेल्या निलगायीला प्रवाशी पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच निलगायीचा देखील मृत्य झाला. घटनास्थळी ज्ञानोबा मुलगीर यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली अन वाहतूक सुरळीत केली. मात्र उशिरापर्यंत वनविभागाचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. Conclusion:वन्यप्राण्यांच्या धडकेत आतापर्यंत दुचाकीस्वाराचाच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अज पहिल्यांदाच दुचाकीस्वार अन वन्यप्राणी दोघांचाही मृत्यू झाल्याने ही धडक किती भयंकर असेल? हा विचार ही न केलेला बरा. हा थरारक प्रकार काही दुचाकी चालकांनी पाहिला असता, त्यांना ही थरकाप सुटला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.