ETV Bharat / state

Hingoli Bus Accident : हिंगोलीत अपघाताची मालिका सुरूच; पुन्हा एका खाजगी बसचा अपघात, 15 जखमी - 15 injured in accident at Jamgavan fork

जिल्ह्यात या दोन महिन्यांत अपघाताची मालिका सुरूच आहे. पुन्हा एका खाजगी बसचा अपघात झाल्याची घटना पहाटे तीनच्या सुमारास नांदेड- हिंगोली मार्गावरील जामगव्हाण ( Accident on Nanded-Hingoli road ) पाटीजवळ घडली आहे. यामध्ये पंधरा कामगार जखमी झाले आहेत. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले ( Moved to Nanded Government Hospital ) आहे.

Bus accident
बस अपघातात 15 जखमी
author img

By

Published : Jan 3, 2022, 11:36 AM IST

हिंगोली : जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कळमनुरी ते नांदेड यांच्यामध्ये प्रचंड अपघात घडत आहेत. तीन दिवसापूर्वी खासगी बस आणि रिक्षा अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा आखाडा बाळापूर ते डोंगरकडा या मार्गावरील जामगाव फाट्यावर अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात पंधरा जण जखमी ( 15 injured in accident at Jamgavan fork ) झाले आहेत. छत्तीसगड मधील रायपूर येथील 60 कामगार सोलापूरकडे एका खाजगी बसने प्रवास करीत होते. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील जामगव्हान फाट्यावरील वळण ( Accident on the turn at Jamgavan fork ) रस्त्यावर बस पुढे नेत असताना, चालकांचे वाहनवरील नियंत्रण सुटले अन बस उलटली.

Bus accident
बस अपघातात 15 जखमी
साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये उडाली खळबळ-पहाटे पहाटे प्रवास करीत असताना, अचानक बसला उलटल्यामुळे साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. कामगार एकमेकावर आदळल्यामुळे एकच गोंधळ उडाला जोर जोरात आरडाओरडा सुरू झाला. मात्र अंधार असल्याने कोणीही जवळ आले नाही, तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे ( Balapur Police Station ) सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमीना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ( For treatment at Government Hospital, Nanded ) रुग्णवाहिकेने हलविले आहे.खाकी वर्दीत झाले माणुसकीचे दर्शन-खाकी वर्दी दिसली की अनेकांच्या भुवया उंचावतात, एवढेच नव्हे तर अंगावर काटा देखील उभा राहतो. मात्र या अपघात थंडीमध्ये कुडकुडत मदतीची याचना करणाऱ्या प्रवाशासाठी खाकी वर्दीतील पोलिस धावून गेले. त्याचबरोबर प्रवाशांना मदत तर केलीच, मात्र व्याकूळ झालेल्या प्रवाशांची चाय नाश्त्याची देखील व्यवस्था पोलिसांनी केली. त्यामुळे पहाटे पहाटे या प्रवाशांना खाकी वर्दीतील माणुसकीचा अनुभव ( Experience humanity in khaki uniforms ) आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.