हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथील तुळजा देवी मंदिरात सेवेकरी असलेल्या गजानन किसन जगताप (32) यांनी मंदिराची साफसफाई करून भोजन कक्षेत गळफास घेऊन आत्महत्या घेतल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस priest committed suicide in hingoli आली. कार्याध्यक्ष व सदस्य त्रास देत temple president and members harassed priest असल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून priest wrote letter to CM कळविले आहे. नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर या सेवेकऱ्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली priest commit suicide by hanging himself आहे.
हिंगोली जिल्ह्यातील घोटा - हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवीहिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे तुळजा देवीचे ठाण आहे. त्यामुळे या ठिकाणी एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर पर जिल्ह्यातूनही भाविक तुळजा देवी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावतात. गावातीलच जगताप कुटुंबाकडे अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिराच्या सेवेचे आहे. नवरात्र महोत्सवामध्ये या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा महोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने, नेहमीप्रमाणे जगताप यांनी मंदिराची साफसफाई सुरू केली होती. साफसफाई करत असताना त्यांनी कार्याध्यक्ष व सदस्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पती पत्नी गेले होते मंदिर सफाईसाठी - तुळजाभवानी मंदिरामध्ये गजानन व त्यांची पत्नी साफसफाईसाठी गेले होते दरम्यान पत्नी ह्या खालच्या तळात तर गजानन हे मंदिराच्यावर असलेल्या भोजन कक्षामध्ये साफसफाई करत होते. मात्र बराच वेळ होऊनही गजानन हे खाली न परतल्याने त्यांच्या पत्नीने भोजन कक्षामध्ये धाव घेतली. गजानन गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. त्यांनी लागलीच आरडाओरड केला. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती करताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण नागरे उपनिरीक्षक रामराव पोटे जमादार हेमंत दराडे पांडुरंग डवले यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सेवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून सांगितली त्रास देणाऱ्यांची नावे - पोलिसांना घटनास्थळी एक चिट्ठी सापडली असून त्यामध्ये त्यांनी आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलतोय याचे कारण सांगितले. तसेच या मंदिराचे कार्याध्यक्ष व काही सदस्यांनी गेल्या काही दिवसापासून त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचे देखील नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठीद्वारे Priest request strict action केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यानुसार आता पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. परंतू नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर सेवेकरी जगताप यांनी गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.