ETV Bharat / state

तक्रारी प्राप्त झाल्याने पाच कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - collector

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे इतर विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शासकीय कामात आता गती येण्याची आणि सर्वसामान्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र,  जिल्ह्यातील अनेक विभागात काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळेही सर्वसामान्याची कामे रेंगाळत आहेत.

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : May 5, 2019, 4:49 AM IST

हिंगोली - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाच कंत्राटी कर्मचाऱ्याना घरचा रस्ता दाखविला आहे. जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये मग्रारोहयो योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी अन विविध कारणाने त्यांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पाच कर्मचाऱ्यांबद्दलच्या तक्रारी

अशोक सूर्यकांत राठोड ( सहाय्यक कार्यक्रम अधिकारी APO) (औंढा नागनाथ) यांच्याबद्दल तालुका स्तरावरून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सुयोग विकास जावळे ( तांत्रिक सहायक हिंगोली) - गटविकास अधिकाऱ्यांचा असमाधानकारक अहवाल तसेच त्यांच्या स्तरावरून वेळोवेळी देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा यामुळे जावळेंना कामावरून काढण्यात आले आहे. नितीन अनिल लोलगे ( तांत्रिक अधिकारी सेनगाव)- जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांनी दिलेल्या नोटिसा. तसेच तालुका स्तरावरून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संतोष बाबुराव गाजरे (तांत्रिक सहाय्यक औंढा नागनाथ) हे सतत कार्यालयात गैरहजर राहत होते. सोबतच बैठकीसही नेहमीच गैरहजर राहणे यांना भोवले आहे. तर देवराव किसन कंठाळे ( लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर ओंढा ना. ) आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आलेल्या कुशल मागणीनुसार निधी न घेताच जास्तीचा निधी एफटीओमार्फत ओढून घेतला.
ही कारणे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी २६ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीत समोर आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ११ महिन्याच्या कालावधीत तात्पुरत्या नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार या पाच कर्मचाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता कामावरून कमी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे इतर विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शासकीय कामात आता गती येण्याची आणि सर्वसामान्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक विभागात काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळेही सर्वसामान्याची कामे रेंगाळत आहेत. त्यांच्याकडेही लक्ष देऊन त्यांच्यावर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात विविध तहसील कार्यालया मध्ये मग्रारोहयो योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी अन विविध कारणाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाच कंत्राटी कर्मचाऱ्याना घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्या मध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

Body:अशा आहेत या पाच कर्मचाऱ्याच्या तक्रारी

अशोक सूर्यकांत राठोड ( सहाय्यक कार्यक्रम अधिकारी APO) ओंढा ना. -यांच्या तालुका स्तरावरून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या,

सुयोग विकास जावळे ( तांत्रिक सहायक हिंगोली) - गटविकास अधिकारी यांचा असमाधान कारक अहवाल, त्यांच्या स्तरावरून वेळोवेळी देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा,

नितीन अनिल लोलगे ( तांत्रिक अधिकारी सेनगाव)- जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांनी दिलेल्या नोटीस व तालुका स्तरावरून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर
संतोष बाबुराव गाजरे (तांत्रिक सहाय्यक ओंढा ना) हे सतत कार्यालयात गैरहजर राहत होते सोबतच बैठकीसही नेहमीच हजर राहणे यांना भोवले आहे. तर देवराव किसन कंठाळे ( लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर ओंढा ना. ) आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आलेल्या कुशल मागणी नुसार निधी न घेताच जास्तीचा निधी एफटीओ मार्फत ओढून घेतला.
अशी ही कारणे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी २६ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीत समोर आली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ११ महिन्याच्या कालावधीत तात्पुरत्या नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार या पाच कर्मचाऱ्याना कोणतीही कल्पना न देता कामावरून कमी केले.

Conclusion:जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाई मुळे इतर विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शासकीय कामात आता गती अन सर्वसामान्याची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यातील अनेज विभागात कंत्राटी मुळेच नागरिक हैराण नव्हते. तर काही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यामुळे देखील सर्वसामान्याची कामे रेंगाळत आहेत. त्यांच्याकडेही लक्ष देऊन त्यांच्यावर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी आता जोर धरू लागली. तर घराचा रस्ता दाखविलेल्या कंत्राटी कर्मचार्यापैकी काही कर्मचारी आता तक्रारी करणाऱ्यांचा शोध घेणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.