ETV Bharat / state

हिंगोलीत पावसाचा धुमाकूळ; औंढा नागनाथ तालुक्यातील 10 गावांचा संपर्क तुटला - हिंगोलीत पावसाचा धुमाकूळ

मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील व इतरही तालुक्यातील पिकांची फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे औंढा तालुक्यातील तर विविध भागात अतिवृष्टी झाली असून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

हिंगोली
हिंगोली
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:21 PM IST

हिंगोली - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिप-रिप सुरु असल्याने खरिपाच्या पिकाची पूर्णता वाट लागली आहे. आज पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी-नाले लगतचे उरलेसुरले खरिपाचे पीक वाहून गेले आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात अतिवृष्टी झाली असून दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील व इतरही तालुक्यातील पिकांची फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे औंढा तालुक्यातील तर विविध भागात अतिवृष्टी झाली असून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते वाहून गेली आहेत. या भागातील नागरिक हवालदील झाले आहेत. पावसाचा जोर हा कायम असून शेतीतील पिके पूर्णपणे खरडून गेली आहेत.

दरम्यान, हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे परतवारीचा सोहळा मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा होतो, परंतु यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्याची वेळ आलेली आहे. याठिकाणी परत वारी निमित्त मिठाची यात्रा भरवली जाते. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यावर्षी चित्र उलट आहे. नामदेव मंदिर परिसरात भाविकांना बंदी घालण्यात आलेली आहे.

मुसळधार पावसामुळे मंदिरालगत असलेली शेतजमीन पूर्णपणे खरडून गेल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसरासह इतरही गावांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच वर्षात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.