ETV Bharat / state

हिंगोलीत १ कोटी रुपयांची रक्कम जप्त, परवानगीविनाच नेली जात होती रक्कम

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने हिंगोली जिल्ह्यात १० ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. येथे वाहनांची अतिशय बारकाईने तपासणी केली जात आहे. अशाच एका तपासणीत ही चारचाकी सापडली. या चारचाकी कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने संशय उत्पन्न झाला.

जप्त केलेल्या रक्कमेसोबत पोलीस
author img

By

Published : Apr 16, 2019, 11:57 AM IST

हिंगोली - चारचाकीमधून नेली जाणारी १ कोटींची रोख रक्कम निवडणूक पथकाने हिंगोलीतील हिवरा पाटी येथे जप्त केली आहे. ही रक्कम नांदेडहून हिंगोलीकडे चारचाकीने ( एम.एच.३८, ८०८२) नेली जात होती. ही रक्कम बँकेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रक्कम नेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते, ती घेतली गेली नाही. तसेच, वाहनात कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने हिंगोली जिल्ह्यात १० ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. येथे वाहनांची अतिशय बारकाईने तपासणी केली जात आहे. अशाच एका तपासणीत ही चारचाकी सापडली. या चारचाकी कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने संशय उत्पन्न झाला. त्यामुळे रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम सीलबंद करुन कळमनुरी येथील उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील बैठक पथक क्रमांक ३ मधील सतीश माळोदे, बागुल, रामराम राठोड, वाबळे यांनी केली. आतापर्यंत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तीन पथकाकडून पाच कारवाया झाल्या असून, यात दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील हिवरा पाटी येथे निवडणूक पथकाने एका कारमधून जाणारी एक कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. ही रक्कम नांदेड हुन हिंगोली कडे एम एच ३८ ८० ८२ या क्रमांकाच्या कार मधून येत होती. ही रक्कम एका बँकेची असल्याची माहिती समोर येते मात्र रक्कम आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्य असते. परंतु या वाहनात कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाहीत.

Body:हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने हिंगोली जिल्ह्यात दहा ठिकाणी चेक पोस्ट उभारलेल्या आहेत. या चेक पोस्टवरून. वाहनांची अतिशय बारकाईने तपासणी केली जात आहे. अशाच परिस्थितीत आज हिंगोली कडे येणाऱ्या कारची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम असल्‍याचे उघड झाले. ही रक्कम एका बँकेची असल्याचे बोलले जात आहे. मात्र अधिकृतरित्या कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे रक्कम सीलबंद करून कार, पोनि व्ही. एम. केंद्रे यांनी कळमनुरी येथील उपकोषागार कार्यालयात जमा केली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कार लावली आहे. आतापर्यंत कळमनुरी विधानसभा मतदार संघात तीन पथकाकडून पाच कारवाया झाल्या असून, या कारवाईत दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त केलेली आहे.

Conclusion:कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचन्द्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पथक क्रमांक तीन मधील सतीश माळोदे, बागुल, रामराम राठोड, पोलीस कर्मचारी वाबळे यांनी केली. एक कोटी रुपयाची रक्कम पकडल्याने हिंगोली मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. बैठे पथक निवडणूक काळात लहान सहान बाबीवर लक्ष ठेवून आहे.

मेल केलेले फोटो बातमीत वापणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.