ETV Bharat / state

'क्रिएटीव्ह इंडस्ट्रीज निर्माण केल्या तरच गोव्यातील ब्रेनड्रेन थांबेल'

गोवा हा भारताच्याही पुढे आहे. त्याला अजूनही उंच उडी घ्यायची असल्यास 'गोवा २०३५ व्हीजन अँड रोडमँप' तयार करण्यात आला आहे. इथे जरी खाण आणि पर्यटन यामधून उत्पन्न मिळत असले, तरी इतर अनेक गोष्टी आहेत.

रघुनाथ माशेलकर
author img

By

Published : Feb 9, 2019, 1:48 PM IST

पणजी - जगभरातील उद्योग विश्वात गुंतवणूक करण्यासाठी गोव्याची ताकद दाखवून दिली पाहिजे. इथेच 'क्रिएटीव्ह इंडस्ट्रीज' अथवा संधी निर्माण केल्या तर गोव्याचे होणारे ब्रेनड्रेन (बुद्धीवहन) थांबेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

रघुनाथ माशेलकर माहिती देताना
undefined

डॉ. माशेलकर गोवाभेटीवर आले असता व्हायब्रंट गोवा फाउंडेशनने त्यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्यांनी फाउंडेशनच्या सदस्यांशी गोव्यातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काय करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. गोव्याच्या आर्थिक सुधारणेवर बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, की गोवा हा भारताच्याही पुढे आहे. त्याला अजूनही उंच उडी घ्यायची असल्यास 'गोवा २०३५ व्हीजन अँड रोडमँप' तयार करण्यात आला आहे. इथे जरी खाण आणि पर्यटन यामधून उत्पन्न मिळत असले, तरी इतर अनेक गोष्टी आहेत. नॉलेज सोसायटी, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, माहिती आणि तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान यामाध्यमातून प्रचंड बुद्धिमत्ता निर्माण करता येईल.

बिग अॅनालेटीक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअॅलटीमध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. अॅनिमेशनही ट्रिलियन डॉलरची इंडस्ट्री आहे. तेथे डिजिटल तंत्रज्ञान आणि डोके वापरायचे आहे. कोणतेही प्रदूषण नाही. त्याचा छोटासा भाग जरी गोव्याला मिळाला तर गोव्याचे कल्याण होईल. गोव्यात अनेक १६ वर्षांचे माशेलकर असतील. त्यांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. याकरिता गोवा सरकार शिष्यवृत्ती देते. यासाटी खास मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आपली ताकद आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढे गेले पाहिजे. मोठ्या आकांक्षा ठेवा. यश 'इन्स्टंट' नसते. त्यासाठी मेहनत करावी लागते. १९७६ पूर्वी काहीच नव्हते. माझे पहिले संशोधन (इक्युपमेंट) यायला २ वर्षे लागली. तंत्रज्ञानामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

undefined

आपल्या नव्या संशोधशाविषयी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, 'बायो मिमँटीक हायड्रोजन' या संशोधनासाठी द वर्ड अकादमी ऑफ सायन्स लिनोवो सायन्स प्राईसकडून २७ नोव्हेंबर २०१८ ला गौरविण्यात आले. एक लाख डॉलर्स म्हणजे सुमारे ७० लाख रोख पारितोषिक आहे. याला विकसनशील देशातील नोबेल म्हटले जाते. यामध्ये स्मार्ट मटेरियल, स्मार्ट हायड्रोजन वापरून कृषी क्षेत्रात औषधांचा वापर कसा करता येईल, हे दाखवून देण्यात आले आहे.

Intro:पणजी : जगभरातील उद्योग विश्वात गुंतवणूक करण्यासाठी गोव्याची ताकद दाखवून दिली पाहिजे. गोवा सुरम्य असल्याचे दाखवून देत इथे गुंतवणूक आणली तर आपल्याला काय केले पाहिजे हे दाखवून दिले पाहिजे. इथेच ' क्रिएटीव्ह इंडस्ट्रीज' अथवा संधी निर्माण केल्यातर गोव्याचे होणारे ब्रेनड्रेन (बुद्धीवहन) थांबेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

Body:डॉ. माशेलकर गोवाभेटीवर आले असता व्हायब्रंट गोवा फाउंडेशनने त्यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्यांनी फाउंडेशनच्या सदस्यांशी गोव्यातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
गोव्याच्या आर्थिक सूधारणेकरिता आपला द्रुष्टीकोन काय आहे असे विचारले असता डॉ. माशेलकर म्हणाले, गोवा हा भारताच्याही पुढे आहे. त्याला अजूनही उंउ उडी घ्यायची असेल तर ' गोवा २०३५ व्हीजन अँड रोडमँप' तयार करण्यात आला आहे. त्या समितीचा मीही सदस्य होतो. त्यामध्ये गोवा पचढं जाण्यासाठी काय करावं हे सांगितले. जरी खाण आणि पर्यटन यामधून उत्पन्न मिळत असले तरी इतर अनेक गोष्टी आहेत. नॉलेज सोसायटी, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, माहिती आणि तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान यामाध्यमातून प्रचंड बुद्धिमत्ता निर्माण करता येईल.
बिग अँनालेटीक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअँलटीमध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, असे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, अँनिमेशनही ट्रिलियन डॉलरची इंडस्ट्री आहे. तेथे डिजिटल तंत्रज्ञान आणि डोकं वापरायचे आहे. कोणतेही प्रदूषण नाही. त्याचा छोटासा भाग जरी गोव्याला मिळाला तर गोव्याचे कल्याण होईल.
गोव्यातून नवे शास्त्रज्ञ निर्माण होताना दिसत नाही याचे कारण काय असेल असे विचारले असता डॉ. माशेलकर म्हणाले, गोव्यात अनेक १६ वर्षांचे माशेलकर असतील. त्यांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. याकरिता गोवा सरकार शिष्यवृत्ती देते. गरज आहे ती खास मुलांवर लक्ष ठेवून पुढे आणले तळ ५० माशेलकर निर्माण होतील.
नव्या पिढीला आपला संदेश काय असेल? यावर डॉ. माशेलकर म्हणाले, आपली ताकद आणि आत्मविश्वासाचँया बळावर पुढे गेले पाहिजे. यासाठी आपल्या आकांक्षा नेहमी मोठ्या ठेवाव्यात. 'इन्स्टंट' यश नसते. त्यासाठी मेहनत करावी लागते. आपली क्षमता ओळखून करायला पाहिजे. १९७६ पूर्वी काहीच नव्हते. माझे पहिले संशोधन ( इक्युपमेंट) यायला दोन वर्षे लागली. संगणक नव्हता. आता तर हातात सुपर कंप्यूटर आला आहे. देश प्रचंड बदलला आहे. मुलांसाठी मोठी संधी आहे.
आपल्या नव्या संशोधशाविषयी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, 'बायो मिमँटीक हायड्रोजन' या संशोधनासाठी द वर्ड अकादमी ऑफ सायन्स लिनोवो सायन्स प्राईसने २७ नोव्हेंबर २०१८ ला गौरविण्यात आले. एक लाख डॉलर्स म्हणज सुमारे ७० लाख रोख पारितोषिक आहे. याला विकसनशील देशातील नोबेल म्हटले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट मटेरियल, स्मार्ट हायड्रोजन वापरून क्रुषी क्षेत्रात औषधांचा वापर कसा करता येईल हे दाखवून देण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.