ETV Bharat / state

विदर्भकन्या झाली महाराष्ट्राची पहिली महिला धुरकरी; पुरुषप्रधान शंकरपटात सीमाची भरारी - sima patil

४५ वर्षांच्या सीमा पाटील या मूळच्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील ज्ञानगंगापूर या गावच्या आहेत. सीमा लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या.

सीमा पाटील
author img

By

Published : Mar 8, 2019, 3:59 PM IST

बुलडाणा - मर्दानी, मैदानी खेळ अशी शंकरपटाची ओळख आहे. भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते. मात्र, या पुरुषप्रधान खेळाला आव्हान दिले आहे सिमा पाटील या मर्दानी महिलेने. सतत बसणारे पुरुषी अहंकाराचे टोमणे ऐकत लढत देऊन विदर्भाची कन्या शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी एक मर्दानी महिला धुरकरी बनली आहे.

४५ वर्षांच्या सीमा पाटील या मूळच्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील ज्ञानगंगापूर या गावच्या आहेत.सीमा लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या. मुक्‍या जनावरांचा त्यांना विशेष लळा, त्यात साथ मिळाली ती जीवन आणि पवन या बैलजोडीची. त्यांनी जवळपास शेकडो शंकरपट गाजवलेत असे सीमाताई सांगतात, तर तब्बल २१ वेळा प्रथम पुरस्कार फक्त आणि फक्त जीवन आणि पवन यांच्यामुळेच शक्य झाल्याचेही त्या म्हणतात.

सीमा पाटील

वयाच्या २० व्या वर्षी सीमा पाटील यांनी पवन आणि जीवन या जुळ्या बैलांच्या आधाराने शंकरपटात भाग घेतला. बघता बघता आज ३० वर्षे लोटली आणि सीमा पाटील ह्या शंकरपटातील केवळ मानकरी न ठरता शंकरपटाच्या पुरुषप्रधान अहंकाराला तडा देणारी पहिली महिला म्हणून प्रकाशझोतात आल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्या सदस्य आहेत. महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नसताना शंकरपटातली जागाही भरून काढली हे सीमाताई आनंदाने सांगतात. मात्र इतके असतानाही शासनाने साधी दखल घेतली नसल्याची खंत आजही त्यांना सलते. कोणतीही शासकीय योजना मिळाली नसून बैलांसाठी त्यांनी ४ वेळा अर्ज केला तरीही गोठा मिळाला नसल्याचे त्या सांगतात. तर त्यांची शासनदरबारी नोंद व्हावी, असेही त्यांना वाटते.

Intro:anchor -- मर्दानी, मैदानी खेळ अशी शंकरपटाची ओळख..  भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडतेय .. शंकरपटात बैलांची शर्यत पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो तर  डोळ्यासमोर उभे रहातात बैल आणि रिंगी हाकणारा रांगडा धुरकरी .. मात्र, या पुरुषप्रधान खेळाला तिने आव्हान दिलेय .. सतत बसणारे पुरुषी अहंकाराचे टोमणे , मागेपुढे  नसल्याने एकाकी लढत देऊन विदर्भाची कन्या शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी एक मर्दानी महिला धुरकरी बनलीय .. हि संघर्षगाथा आहे सिमा पाटील या मर्दानी महिलेची ..Body:व्हिओ -१-- पंचेचाळीस  वर्षांच्या सीमा पाटील ह्या मूळच्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील ज्ञानगंगापूर या गावच्या...  त्यांचे वडील पोलिस पाटील होते...  घरी शेती आणि एक बैलांची जोडी होती... सीमा लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या. .. मुक्‍या जनावरांचा त्यांना विशेष लळा पहिल्यापासूनच ,त्यात साथ मिळाली ती जीवन आणि पवन या बैलजोडीची...  जीवन आणि पवन हे सीमा यांच्यासाठी  आई- वडील-भाऊ-बहीण हे सर्व नाते निभावत होते.. . त्यांनी जवळपास शेकडो शंकरपट गाजवलेत असे सीमाताई सांगतात... तब्बल 21 वेळेस तर प्रथम पुरस्कार फक्त आणि फक्त जिवन आणि पवन यांच्यामुळेच शक्य झालेय .. 

बाईट -- सीमा पाटील , महिला धुरकरी .. 

व्हिओ -२- सीमाताईचे वडील दरवर्षी शंकरपट पाहायला जायचे .. एकदा त्या वडिलांसोबत शंकरपटात गेल्या... बैलांना धरून उभ्या असलेल्या सीमाताईंना काही पुरुषांनी "हा मर्दानी खेळ आहे, महिलेला नाही जमायचा‘ असा टोमणा मारला...  हे शब्द सीमाताईंच्या जिव्हारी झोंबले आणि त्यांनी या पुरुषी अहंकाराला आव्हान देण्याचा निर्धार केला आणि यात त्यांना साथ फक्त जिवन आणि पवन याच बैलजोडीनं दिलीय .. वयाच्या २० व्य वर्षी सीमा पाटील यांनी पवन आणि जीवन या जुळ्या बैलांच्या आधाराने शंकरपटात भाग घेतला .. बघता बघता आज ३० वर्षे लोटली आणि सीमा पाटील ह्या शंकरपटातील केवळ मानकरी न ठरत शंकरपाटाच्या पुरुषप्रधान अहंकाराला तडा देणारी पहिली महिला म्हणून प्रकाशझोतात आलीय ..

बाईट -- सीमा पाटील , धुरकरी .. 

व्हिओ -३-- शेतातच त्यांनी रिंगीवर  बैलांना पळविण्याचा सराव सुरू केला.. . त्यानंतर त्यांनी शंकरपटात भाग घ्यायचे ठरविले... त्यावेळी त्यांना टीकाही सहन करावी लागली... यातच मध्यंतरी त्यांचे लग्न झाले मात्र शंकरपटाची आवड असलेल्या सीमाताईंना त्यांच्या पतीचा विरोध होऊ लागला म्हणून त्यांनी या खेळापायी एकाच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला.. . मात्र, न डगमगता त्यांनी उत्कृष्टपणे शंकरपट गाजविला आणि विदर्भाला सर्वोच्च मान मिळवून दिला... तेव्हापासून आजतागायत म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून त्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आयोजित शंकरपटात सहभागी होत आहेत.. सीमाताईंच्या आयुष्याचा प्रवास सोपा नाही...  घटस्फोट झाल्यापासून  वडिलांच्या घरी राहुन त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात झोकून दिले...  वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र त्या एकाकी पडल्या... त्यांना खूप खस्ता खाव्या लागल्या. पेरणी, कोळपणी फवारणी त्यांनतर पिकांची इतर प्रकारची काळजी घेणे याचबरोबर बैलांची काळजी घेणे हे सर्व त्यांनी एकटीनेच केले.. .  सोबतच प्रत्येक शंकरपटात भाग घेतले...  चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत २६ ठिकाणी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेय .. तसेच त्यांना विदर्भकन्या म्हणून पुरस्कारीत करण्यात आलेय .. 

बाईट -- सीमा पाटील .. 

व्हिओ -४-- सीमाताईंनी जवळ कोणताही पशुवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आपल्या बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतः जनावरांच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते प्रशिक्षण घेतले... त्यांच्या बैलांसोबत त्यांनी वेळ पडली तर गावातील अनेक जनावरांच्या आरोग्यासाठी काम हि केलेय .. ताईंच्या प्रेमळशा  स्वभावामुळे त्यांना महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले..  ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेय ..  भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्या सदस्य आहेत. .. त्यांना गावात मानाचे स्थान आहे...  महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नसताना शंकरपटात ली जागा भरून काढली हे सीमाताई आनंदाने सांगतात .. मात्र एव्हढे असताना हि शासनाने साधी दखल घेतली नसल्याची खंत आजही त्यानं सलते .. तर त्यानं शासकीय योजना कोणतीही मिळाली नसून त्यांच्या वैलांसाठी त्यांनी ४ वेळा अर्ज केलाय तरीही गोठा मिळाला नसल्याचे त्या संगतात .. तर त्यांची शासनदरबारी नोंद व्हावी असेही त्यांना वाटते .. 

बाईट -- सीमा पाटील , धुरकरी .. 

व्हिओ -५-- महिला या पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत...  पुरुषांनी महिलांवर टीका करू नये,  त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, आणि  महिलांनीही आपली कार्यक्षमता सिद्ध करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालावे  हि त्यांनी केलेय .. तर महिला दिन फक्त हा नावापुरताच असून महिलांचा कोठेही सन्मान केल्या जात नाही याची खंत त्यांना आजही खुपते .. 

-वसीम शेख, बुलडाणा-

याच slug ने पुन्हा बाईट पाठवीत आहे..

कृपया बाईट पूर्ण ऐकावे..Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.