गोंदिया - जिल्हा परिषदेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ९२ हजार घरे तयार करण्याचे लक्ष असून त्यातील ८६ हजार घरांना मंजुरी मिळाली आहे. त्यातच ८० हजार घरांना पाहिले हप्ते वाटप करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४५ हजार घरांचे काम पूर्ण होत आले आहेत.
दोन ग्रामपंचायतीत जावून लाभार्थ्यांशी साधला संवाद -
घरकुलासाठी रेती, विटा तथा इतर साहित्यासाठी येणारी शासकीय अडचण दूर व्हावी, तथा घरकुलांचे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्त्वास जावे, यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी थेट खमारी व अदासी या दोन ग्रामपंचायतीत जावून लाभार्थ्यांशी संवाद साधला. खमारी या गावात ४५० लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत गावकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या आहेत समस्या -
गावकऱ्यांना रेती उपलब्ध होत नाही. शिवाय विटा, पाणी प्रश्न तसेच साहित्याची ने-आण करण्यासाठी मोठा खर्च येतो. यासह इतर समस्या गावकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडल्या. तसेच रेतीसाठी शासनाला कोणत्याही प्रकारचा निधी देण्याची गरज भासणार नाही. मात्र, वाहतुकीचा खर्च गावकऱ्यांनी करावा, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी इतर साहित्य सुद्धा गावात उपलब्ध व्हावे, यासाठी गावातच घरकूल मार्ट उभारण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माडली. हे मार्ट बचतगटांतर्गत असल्याने लाभार्थ्यांना कमी दरात घरकूल साहित्य उपल्बध होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगिलते.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाला माविआचा पाठिंबा, नेते थेट दिल्ली बॉर्डर वर