गोंदिया - शहर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमसमोरील नेहरू चौक परिसरात किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. मुरली शर्मा (वय 20, रा. कृष्णपुरा वार्ड, गोंदिया) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
आपसातील वादामुळे ही हत्या झाल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे. दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वारकरून मुरलीची हत्या करण्यात आली आहे. यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मुरली शर्माला गोंदिया जिल्हा रुगालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गोंदियातील काही भागात तणाव निर्माण झाला होता. ज्या युवकाची हत्या झाली त्याच्यावरही या आधी काही प्रकरणात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, नितीन सांवत पुढील तपास करत आहेत.
अज्ञात आरोपीविरुद्ध 302 व 323 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे तपास अधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. तसेच या हत्या प्रकरणात ५ आरोपी असल्याचे बोलले जात आहे.