गोंदिया - खामखुरा या गावात धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घडली आहे. मृत बालिकेचे नाव नायरा भवेश राऊत असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या खामखुरा येथील निराशा हिचे भवेश राऊत याच्याशी दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. भवेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा तसेच मद्यपान करून तिला नेहमी मारहाण करायचा. ती गर्भवती असतानाच या त्रासाला कंटाळून ती माहेरी खामखुरा येथे आली होती. ११ ऑक्टोबर रोजी तिने गोंडस बालिकेला जन्म दिला. मात्र भवेश शुक्रवारी एका इसमासोबत दुचाकीने खामखुरा येथे आपल्या सासरी आला. त्याने घरात येऊन पाळण्यात झोपलेल्या बाळाला जमिनीवर आपटले. त्यामुळे बालिकेचा मृत्यू झाला. जन्मदाता आरोपी भवेश विरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हत्येमागचे कारण अद्याप समजले नाही.
हेही वाचा - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूपहेही वाचा - पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन; नागरिकांना गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन