गोंदिया - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप आण्याचे प्रयत्न करत असल्याचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल म्हणाले.
हेही वाचा - गोंदिया शहरात गँगवॉरमध्ये एकाची हत्या, तर एक जखमी, सर्व आरोपी फरार
गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील ७ विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी तिथे शिक्षण घेण्यासाठी गेले असून, आज जी आपत्ती आली आहे, त्यामुळे ते तिथे फसले आहेत. त्यांच्या पालकांनी मला संपर्क साधला असून मी स्वतः विदेश मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नावाची सूची मोबाईल नंबरसह दिली आहे. प्रश्न असा आहे की, ज्या दिवशी माझा कडे ही सूचना आली त्याच दिवशी युक्रेनची हवाई सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. म्हणून माझ्याकडे काही पर्याय नव्हते, नाही तर आम्ही त्यांना तिकिटासाठी पैसे पुरवून त्यांना तिथून काढण्यासाठी प्रयत्न केले असते, अशी प्रतिक्रिया माजी कंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी दिली.
मला विश्वास आहे, अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार भारतीय कुठे अडकले असले तर त्यांना मदत करते. ते कोविडमध्ये असो किंवा कोणत्याही कारणाने अडकले असले तरी, एवढ्या वर्षात जिथे जिथे अशा अडचणी त्यासाठी भारत सरकार मदत करत असते. भारतातील सर्व दुतावास जे युक्रेनमध्ये आहेत त्याप्रमाणे आजूबाजूला पोलॅन्ड, रोमानिया इथले दूतावास आहेत, ते तिथल्या सीमेवर जाऊन बस असो किंवा ज्या काही सुविधा उपलब्ध होत आहेत त्यामाध्यमातून अडकलेल्यांना भारतात पाठविण्याचे काम सुरू आहे. हे महत्वाचे काम आहे व भारत सरकार पूर्ण लक्ष देत आहे. तसेच, मी पण आमच्या गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप आण्याचे प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - गोंदिया शहरात गँगवॉरमध्ये एकाची हत्या, तर एक जखमी, सर्व आरोपी फरार