गोंदिया - जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात 9 रुग्णांची भर पडली असून गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 59 वर गेली आहे.
यात 3 रुग्ण या आधी कोरोनामुक्त झले असून 56 रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. जिल्हातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता 13 कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले आहे. ज्या रुग्णांना कोरोना विषाणुचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे स्थलांतरित मजुरांमुळे ही संख्या वाढल्याचे या आधीच स्पष्ट केले असले तरी जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.