ETV Bharat / state

Gondia Leopard And Pigs Death : विहिरीत बिबट्यासह तीन रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले - बिबट्या मृतावस्थेत आढळून आला

गोंदियातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील किडंगीपार जवळ विहरीत तीन रानडुकरे आणि बिबट्या मृतावस्थेत आढळून आला ( Gondia Leopard And Pigs Death ) आहे. पाठलाग करताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

Gondia Leopard And Pigs Death
Gondia Leopard And Pigs Death
author img

By

Published : Jan 23, 2022, 2:31 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता तिरोडा वनपरिक्षेत्रातील किडंगीपार जवळी एका शेत शिवाऱ्यात असलेल्या विहिरीत बिबट्यासह तीन रानडुकरे मृतावस्थेत आढळून आले ( Gondia Leopard And Pigs Death ) आहेत. वनविभागाने त्या वन्यप्राण्यांचे मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदन करुन त्यांचा अंतविधी केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, किडंगीपार येथील रहिवासी हरिचंद दादूजी तुरकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या व तीन रानडुक्कर मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी एस. के. एकरे, क्षेत्र सहाय्यक एस. जी. पारधी, बीट गार्ड महेंद्र सूर्यवंशी व वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती वनसंरक्षक व सहायक वनसंरक्षक यांनाही देण्यात आली आहे. त्यानंतर मृत बिबट्या व तीन डुकरांना बाहेर काढण्यात ( Gondia Leopard And Pigs Death ) आले.

ही घटना पाहता बिबट्याने डुकरांची शिकार करण्यासाठी त्यांचा पाठलाग ( Leopard Attacked Wild Pigs ) केला. यावेळी तीन रानडुकरांसह बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवला जात ( Leopard In Well ) आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच, पुढील वैज्ञानिक परीक्षणासाठी सदर मृत बिबट्या अवयवाचे नमुने जतन करून ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर मृत बिबट्या व दोन रानडुक्कर यांना दहन करून व एका रानडुक्करास खोल खड्यात पुरून विल्हेवाट लावण्यात आली.

हेही वाचा - नाशिक : 200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणार; आदित्य ठाकरेंची आयुक्तांना आराखड्यात बदल करण्याची सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.