ETV Bharat / state

शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट ही राजकीय नाही - खासदार प्रफुल पटेल - Praful Patel in gondia

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेटीला राजकीय महत्व नाही. कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधानांशी भेट घेतल्याचे स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिले.

Chandrakant Patel statement Praful Patel
लोकार्पण कार्यक्रम गोंदिया प्रफुल पटेल
author img

By

Published : Jul 18, 2021, 5:42 PM IST

गोंदिया - गोंदियात आज पोलीस विभागाला ४६ वाहने मिळालीत. या वाहनांचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेटीला राजकीय महत्व नाही. कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधानांशी भेट घेतल्याचे स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिले.

प्रतिक्रिया देताना खासदार प्रफुल पटेल

हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागात पुन्हा गजबजल्या शाळा; १४२ शाळा सुरू

भेट शरद पवार यांनी घेतली होती. त्यामुळे, कुणी या भेटीला राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचे देखील प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदियात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज ठाकरे - चंद्रकांत पाटील भेटीबाबत म्हणाले...

भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हंटले होते की, ईडी अर्ध्या रात्री कुणालाही अटक करू शकते, यावर, समोर काय होते ते पुढच्या पूढे पाहू, असे सांगत पटेल यांनी यावर अधिक बोलणे टाळले. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेटीबाबत, भेटूनच काही नवीन घडत असले तर आम्हीपण दररोज भेटायला तयार आहोत. भेटीमुळे काहीच होत नाही. प्रत्येकाची पॉलिटिकल लाईन असते, त्या पॉलिटिकल लाईनप्रमाणे प्रत्येक पक्ष काम करीत असतो. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची लाईन ठरली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतो, असे सांगत प्रफुल पटेल यांनी चंद्रकात पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर अधिक बोलणे टाळले.

पटोलेंबाबत बोलण्याची इच्छा नाही - पटेल

नान पटोलेंबाबत नवीन बोलून वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आता पटोलेंबद्दल बोलायची माझी मुळीच इच्छा नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. अनिल देशमुखांच्या काटोल येथील घरावर ईडीने धाड मारली. मात्र, ते न्यायिक प्रकरण आहे. देशमुख हे न्यायालयात गेले असून समोर काय होणार ते दिसरणार, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा - सिलिंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी, गोंदिया जिल्ह्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.