ETV Bharat / state

वडिलानेच केली पोटच्या मुलाची हत्या, शिलापूर गावातील घटना - शिलापूर हत्या बातमी

देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिलापूर गावात वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

crime
शिलापूर गावात वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या
author img

By

Published : Oct 1, 2020, 3:04 PM IST

गोंदिया - देवरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिलापूर गावात वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

३६ वर्षीय मृतक माखन वघारे याला दोन पत्नी असून मृतकाच्या दोन्ही पत्नी गावात वेगवेळ्या ठिकाणी राहत होत्या. तर दुसऱ्या पत्नीला घरी आणण्याचा आग्रह मृतक माखन हा आपल्या वडिलांकडे करत होता. याच कारणावरून या दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. काल संध्याकाळी माखन'ने याच विषयावर त्याच्या वडिलांशी भांडण केले.

मात्र भांडण इतके विकोपाला गेले की सखाराम यांनी कुऱहाडीच्या दंडाने माखन च्या डोक्यावर वार केले. या भांडणात माखनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी आरोपी सखारामला ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदना करिता पाठविला आहे.

तसेच देवरी तालुक्यात दोन दिवसाआधी देखील मोठ्या भावाने जमिनीच्या वादातून लहान भावाची हत्या करीत जंगलात मृतदेह फेकला होता. त्यामुळे देवरी तालुक्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही का? असा प्रशन निर्माण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.