गोंदिया - सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरल्याने एक तरुण वाघ नदीत पडला होता. त्याचा 32 तासानंतर मृतदेह सापडला आहे. गोंदियात कावड यात्रेनिमित्त राजेश आसाराम मरस्कोल्हे (वय १७) रजेगाव घाटावर गेला होता. यावेळी तो वाघ नदीत पडल्याची घटना घडली होती.
राजेश नदीत पडल्याने रविवार पासून शोधमोहीम राबवण्यात आली होती. परंतु, रात्रीपर्यंत पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाला अपयश येत होते. दरम्यान, सोमवारी पुन्हा सकाळपासून स्थानिक ढिवरांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास नदीच्या तळाशी राजेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून जिल्हा शोध व बचाव पथक, रावणवाडीचे पोलीस यांनी ही कामगिरी पार पाडली.