गोंदिया - जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीबरोबरच धुक्याची चादरही पसरलेली पहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहे. परिसरामध्ये थंडीची लाट अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - अनेक महिन्यांपासून घंटागाड्या बंद; संतप्त नगरसेवकांनी फेकला नगराध्यक्षांच्या दालनात कचरा
मागील आठवड्यापासून गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्याचा पारा 5 अंशावर गेला होता. मात्र, नवीन वर्षाची सुरवात पावसाने आणि थंडी तसेच धुक्यांनी झाली. शनिवारी गोंदियाचा पारा 7 अंशावर गेला. थंडीबरोबर धुकेही पडत असल्याने याचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पारा 5 अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली आहे.