ETV Bharat / state

गोंदियात विना अनुदानित शाळांना कायम करण्याची कृती समितीची मागणी; मागणीच्या पूर्ततेसाठी शिक्षक चढले झाडावर

author img

By

Published : Aug 17, 2019, 7:42 PM IST

अनुदानाची घोषणा आणि त्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित होत नाही. तसेच विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील एकही शाळा उघडणार नसल्याचे समितीने सांगितले आहे.

गोंदियात विना अनुदानीत शाळांना कायम करण्याची कुती समितीची मागणी

गोंदिया - महाराष्ट्र राज्य विना अनुदानित व उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने विना अनुदानित शाळांना कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, या मागणीसह मुंबई येथील आझाद मैदानावर समितीच्या वतीने ६ ऑगस्टपासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, या मागण्या तत्काळ पूर्ण व्हाव्या यासाठी दोन शिक्षकांनी झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

अनुदानाची घोषणा आणि त्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित होत नाही. तसेच विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील एकही शाळा उघडणार नसल्याचे समितीने सांगितले आहे. याकरिता ९ ऑगस्टपासून जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर विना अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत.

आज १७ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या मंडपात आंदोलन सुरू होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या झाडावर सालेकसा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एन. सी. मच्छीरके आणि सचिन कनिष्ठ महाविद्यालय पाटेकुर्राचे प्राध्यापक भास्कर लांजेवार झाडावर चढले. त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला. या दोघांनी झाडावरुन खाली उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला.

याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलाश बोरकर यांनी मध्यस्ती करून माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास हे दोन्ही शिक्षक खाली उतरले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 17-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_17.aug.19_teacher virugiri_7204243

टीप:- या बातमीचे विडिओ आणि बाईट व वन टू वन मोजो ने पाठविले आहे

शिक्षकांनी झाडावर चळून वीरू गिरी करत आत्महत्त्यांचा पर्यत्न

शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Anchor:- महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक कृती समितीच्या वतीने विनाअनुदानीत शाळांना कायम करून शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, या मागणीकरिता मुंबई येथील आझाद मैदानावर ६ ऑगस्ट पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या आंदोलनाला दिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमीक आणि उच्चमाध्यमीक शाळांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यंत अनुदानाची घोषणा आणि त्यासंबंधी शासन निर्णय निर्गमीत होवून विना अनुदानीत शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा करण्यात येत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील एकही शाळा उघडणार नाही, याकरिता.९ ऑगस्ट पासून जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे.त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर विनाअनुदानीत माध्यमीक आणि उच्चमाध्यमीक शाळा कृती समितीच्या माध्यमातून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत. आज १७ ऑगस्ट ला जिल्हा परिषदेच्या समोर मंडपात आंदोलन सुरू असताना दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या झाडावर सालेकसा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एन. सी. मच्छीरके आणि सचिन कनिष्ठ महाविद्यालय पाटेकुर्राचे प्राध्यापक भास्कर लांजेवार झाडावर चढले. त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला. खाली कुदण्याचा देखील प्रयत्न केला. या माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याची कुमक, अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोपर्यंत कायम करण्याचे लेखी आश्वासन होत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलाश बोरकर यांनी मध्यस्ती करून माध्यमीक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ते दुपारी दीड वाजताच्या सुमा्रास खाली उतरले.

VO:- आज शनिवारी शासकीय सुटी होती. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात शुकशुकाट होता. दरम्यान दोन शिक्षक झाडावर चढले. कसलीही सूचना न देता हा प्रकार घडल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मनधरणीचा प्रयत्न करून देखील शिक्षक झाडावरून उतरत नसल्याने पोलिसांना घाम फुटला होता. मात्र लेखी आश्वासन आणि संघटनेच्या नेत्यांच्या आग्रहाखातर ते खाली उतरल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

BYTE:- भास्कर लांजेवार (झाडावर चढलेला शिक्षक)

BYTE:- कैलास बोरकर (अध्यक्ष, जिल्ह्या कृती समिती)

BYTE:- सुनील मांडरे (उपशिक्षणाधिकारी)

01 to 01 :- ओमप्रकाश सपाटे Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.