ठाणे FIR Against Akshay Shinde : बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे या नराधमाचं ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे. या प्रकरणात आता विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत आहे. मात्र आता ठाणे पोलिसांनी नराधम अक्षय शिंदे याच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी नराधम अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा : पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बाहेर काढलं होतं. पोलीस त्याला चौकशीसाठी नेत होते. दरम्यान प्रवासात अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यावेळी जखमी अक्षय शिंदे याला रुग्णालयात दाखल केलं असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अक्षय शिंदे यानं गोळीबार केल्यामुळे पोलिसांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याप्रकरणी महिलांनी केला जल्लोष : ठाणे पोलिसांनी बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलांनी मोठा जल्लोष केला. महिलांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून बदलापुरात आनंद साजरा केला आहे. अक्षय शिंदे याचं पोलिसांनी एन्काउंटर केल्याचा महिलांकडून आनंद साजरा करण्यात येत आहे. त्यासह ठाणे पोलिसांचं कौतुकही महिलांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- पोलिसांवर बंदूक उचलली तर . . . , देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय शिंदे एन्काउंटरवर दिलं रोख'ठोक' उत्तर - Devendra Fadnavis On Encounter
- बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी विरोधक सरकारवर तुटून पडले; बनाव असल्याचा गंभीर आरोप - Badlapur Encounter Case
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम एन्काउंटरमध्ये ठार; पोलिसांनी घातली गोळी अन् 'गेम फिनिश' - Badlapur Rape Accused Encounter