गोंदिया - महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीवर टीका करताना भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांची जीभ घसरली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारने चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी केली असल्याची टीका केली आहे.
संपूर्ण राज्यात आज (मंगळवारी) महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोंदियातही धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात असताना महाविकास आघाडीवर टीका करताना खासदार मेंढे यांची जीभ घसरली.