ETV Bharat / state

गोंदिया अनलॉक - कोरोना नियमांचे उल्लंघन, पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गोंदिया जिल्हा अनलॉक झाला असून पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. जिल्ह्याता कोरोना वीषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसले

social discrimination rules have been violated and the Gondia district has been unlocked
गोंदिया अनलॉक - कोरोना नियमांचे उल्लंघन, पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
author img

By

Published : Jun 7, 2021, 8:21 PM IST

गोंदिया - राज्य सरकारच्या निकषा प्रमाणे गोंदिया जिल्हा हा लेव्हल १ मध्ये आल्याने आज पासून गोंदियाजिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी गोंदियातील बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक दुकानात एकाच वेळेला ग्राहक आल्याने सोशल डिस्टंसिगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. अनेक लोक विनामास्क रस्त्यावर फिरताना फिरताना दिसत होते.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या आत -

राज्य शासनाने ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांचा पहिल्या स्तरात समावेश केला आहे. या जिल्ह्यात ७ जून पासून जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे शिथील करण्यात आले असून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरु झाले असून जिम, गार्डन, सिनेमा गृह, फूड पार्क देखील सुरु झाले आहेत. यामुळे छोटे व्यावसायिक आणि जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. उद्योग धंदे, छोटे मोठे व्यवसाय, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला तर व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. मात्र, जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा २ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध पूर्णपणे शिथील करत जिल्ह्यात आजपासून अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून सर्व व्यवहार पूर्णपणे सुरळीत सुरु झाले आहेत. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, आज अनलॉक होताच लोकांनी बाजारात पेठेत मोठी गर्दी केली, त्याच प्रमाणे रस्त्यावर फिरणारे लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अनेक दुकानात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे ही दिसत आहे. असेच राहिले तर कोरोना रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे कुठे तरी प्रशासनाणे वचक ठेवण्याची गरज आहे.

गोंदिया अनलॉक - कोरोना नीयमांचे उल्लंघन, पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फजा

मद्यशौकिन नाराज -

दुसरीकळे मात्र मध्य दुकाने मात्र अजूनही बंद असून फक्त सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत दुकाने उघडी करण्याचे आदेश दिले आहेत. ११ नंतर पार्सलची सुविधा उपल्बध असल्याने मद्यशौकिनांची मात्र निराशा झाली आहे.

शासनाच्या परिपत्रका प्रमाणे काय झाले सुरू -

  • अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने, आस्थापना
  • इतर वस्तूंची सर्वच दुकाने, किरकोळ वस्तू विक्री दुकानांचा समावेश
  • सार्वजनिक मैदाने, उद्याने, प्रार्थना स्थळे, मार्निंग वॉक, सायकलिंग
  • सर्वच प्रकारचे खेळ, मैदानी खेळ, प्रशिक्षण
  • सर्व खासगी व शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू
  • सभा, निवडणुका घेण्यास परवानगी
  • सर्व प्रकारची वाहतुक व्यवस्था, आंतरजिल्हा प्रवासास परवानगी, मालवाहतूकीस परवानगी
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर यासाठी ग्राहकांना पुर्वीच अपॉईटमेंट घेउन जावे लागणार आहे.

अंत्यविधीस २० जणांना परवानगी -

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढु नये यासाठी जिल्ह्यात अंत्यविधीसाठी २० जणांना उपस्थिती राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आंतरजिल्हा प्रवासाला मुभा -

कोरोनाचा संसर्ग विचारात घेता मागील दोन महिन्यापासून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, आता अनलॉक अंतर्गत हे निर्बंध पूर्णपणे शिथील करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची वाहतूक आणि आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

नियमांचे करावे लागणार पालन -

कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने अनलॉक करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.