ETV Bharat / state

शिवसैनिकांकडून नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. पटोलेंनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढत पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

नाना पटोलेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
author img

By

Published : Aug 30, 2019, 11:38 PM IST

गोंदिया - काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. एस.टी.महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर घेतले जाणारे पैसे मातोश्रीवर जातात असा आरोप नाना पटोलेंनी केला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढत पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या घटनेमुळे गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांच्या यात्रा निघाल्या आहेत. यातच काँग्रेसचे राज्य प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी महापर्दापाश यात्रेत अमरावतीच्या सभेत प्रवासी विमा प्रकरणी शिवसेना विरोधी वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात उमटले.

शिवसैनिकांनी नाना पटोलेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले दहन

अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गोरेगाव येथे शिवसैनिकांनी पटोले यांच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आणि फोटोचे दहन करण्यात आले. तसेच निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणाने गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात दिला.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 30 -08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_30.aug.19_shiv shena andolan_7204243

शिवसैनिकांनी केले नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Anchor: काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी एस.टी.महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर घेतले जाणारे पैसे मातोश्रीवर जातात असा निराधार आरोप नाना पटोले यांनी केला त्यामुळेच शिवसे नी विरोधी वक्तव्याचा निषेध करत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे शिवसैनिकांनी
निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन केले. या दरम्यान आक्रोश व्यक्त करत ठाणेदारांना निवेदन दिले. या घटनेमुळे गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते..

Vo: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांच्या यात्रा निघाल्या. यातच काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी महापर्दापाश यात्रेत अमरावतीच्या जाहीर सभेत प्रवासी विमा प्रकरणी शिवसेना विरोधी वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात उमटले. अपमानास्पद आणि बदनामीकारक केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गोरेगाव येथे शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आणि फोटोचे दहन करण्यात आले. निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणाने गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.