ETV Bharat / state

गोंदिया : अखेर सोमवारपासून घंटा वाजणार; पालकांकडून संमतीपत्रक आवश्यक - गोंदिया शाळा उघडणार

राज्यात १३ मार्च २०२०पासून साथरोग अधिनियम १८९७ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदर आदेशाच्या तरतुदी जिल्ह्यात लागू आहेत. शासनाकडून शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२०पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

gondia schools
गोंदिया शाळा
author img

By

Published : Nov 21, 2020, 8:24 PM IST

Updated : Nov 21, 2020, 10:07 PM IST

गोंदिया - अखेर सोमवारी 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात इयत्ता ९ वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी शासन निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील सीमाक्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन वगळून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेली शाळा/विद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२वीचे वसतिगृह व आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात १३ मार्च २०२०पासून साथरोग अधिनियम १८९७ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत व सद्यस्थितीत सदर आदेशाच्या तरतुदी जिल्ह्यात लागू आहेत. शासनाकडून शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेले आहे. त्यानुसार इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२०पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पालकांची संमती घेणे आवश्यक -

शाळा सुरू करण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. कोरोनाबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६०नुसार शिक्षेस पात्र असेल. तसेच त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी सांगितले आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी...

  1. शाळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे.
  2. शिक्षकांची कोविड-१९ बाबतची तपासणी करणे.
  3. कार्यगट गठीत करणे, बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे.
  4. शारीरिक अंतरच्या नियमांच्या अंमलबजावणी करीता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करण्यात यावे.
  5. शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध असेल.
  6. पालकांची संमती घेणे आवश्यक आहे.
  7. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सदस्य यांना कोरोना संदर्भातील आवाहने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करावी.
  8. शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करुन माहितीचे एकत्रिकरण करावे.
  9. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत, शाळेच्या परिसरात स्वच्छता तसेच आरोग्यदायी परिस्थिती सतत राखून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन सुनिश्चित करणे.
  10. वर्गखोल्या आणि इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करणे.
  11. अभ्यासवर्गाची व्यवस्था करणे व कोरोना संशयित आढळल्यास त्वरित दखल घेऊन आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले आहे.

Last Updated : Nov 21, 2020, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.