गोंदिया - जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील शेतकरी जयपाल अंताराम मारवाडे यांच्या शेतात काही महिला धान कापत असताना त्यांना मोठा साप दिसून आला. महिला काही वेळासाठी घाबरल्या. मारवाडे यांनी ही माहिती स्थानिक सर्प मित्र संघर्ष जनबंधू यांना दूरध्वनी वरून संपर्क करून दिली. सर्प मित्र संघर्ष हा आपल्या सहकाऱ्याला घेऊन घटनास्थळी आले. शेतात कापलेल्या धानाच्या कडपात असल्याने त्याला पकडून वनविभागाला सोपवण्यात आले.
वनविभागाने त्या सापाला चार गावच्या जंगलात सोडले. हा साप हा अजगर जातीचा असून लांबी ७ फुट तर् वजन ८.५० किलो होते. सर्प मित्राने त्या सापाला जीवनदान दिले.
'चितटी' दूर्मिळ अजगरावर उपचार करून दिले जीवदान
जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी गावाजवळ सात फूट लांबीच्या दुर्मिळ अजगरावरून (चितटी) दुचाकी वाहन गेल्याची घटना १ जुलै २०२०ला घडली. यात अजगराच्या तोंडाला इजा झाली आहे. परिसरातील नागरिकांनी याची माहिती तेथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व सर्पमित्रांना दिली. सर्पमित्रांना ही बाब कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत सर्पमित्रांनी अजगराला सडक-अर्जुनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले.