गोंदिया - जिल्ह्यात २१ डिसेंबरला होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Elections 2021 ) निवडणुकांच्या प्रचार तोफा आज (रविवारी) थंडावल्या आहेत. अनेक गावात आज (रविवारी) प्रचार रॅली ( Promotion Rally ) एकमेकांसमोर येऊन धडकली. यावेळी उमेदवारांनी देखील एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. गोंदियाच्या फुलचूर जिल्हा परिषद ( Phulchur Zilla Parishad ) क्षेत्रात देखील काहीशी अशीच जुगलबंदी भाजपा आणि राष्ट्रवादी ( BJP and NCP Candidates ) काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळाली.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३ जागांवर तर, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांवर आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार आहे. ८ लाख ३८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क २१ डिसेंबरला बजावणार आहेत. यासाठी १३४५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ उमदेवार तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमदेवार, नगर पंचयतीच्या ४५ जागांसाठी २९३ उमदेवार रिंगणात उभे आहेत. आज जरी प्रचार तोफ थंडवली असली तरी उमदेवार उद्यापासून (सोमवारी) छुप्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहचार आहेत. गोंदियात जिल्ह्यात आतापर्यंत भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सेनेच्या उमेदवारांसाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादी उमेदवारांसाठी प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतरही पक्षाचे नेते प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. येत्या १९ जानेवारीला निकाल लागणार आहे. यावरुन पुढील चित्र स्पष्ट होईल.
- एकूण मतदार आणि मतदान
गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ८ लाख ३८ हजार ९७७ मतदार करणार आहेत. गोंदिया तालुका एकूण मतदान संख्या २ लाख ३१ हजार ४७८ आहे. पैकी पुरुष मतदान संख्या १ लाख १४ हजार ८९० तर महिला मतदार संख्या १ लाख १६ हजार ५८७ आहे. तिरोडा तालुका एकूण मतदार संख्या १ लाख १९ हजार २४ पुरुष मतदार संख्या ५९ हजार ५६९ तर महिला मतदार संख्या ५९ हजार ४५५ आहे. आमगाव तालुका एकूण मतदार संख्या ७१ हजार १४५ असून पुरुष मतदार संख्या ३५ हजार ४३० तर महिला मतदार ३५ हजार ७१५ आहे. सालेकसा तालुका एकूण मतदार संख्या ६४ हजार ८९० असून पुरुष मतदार संख्या ३२ हजार ५३३ तर महिला मतदार संख्या ३२ हजार ३५७ आहे. देवरी तालुका एकूण मतदार संख्या ७५ जाहीर ३५५ असून पुरुष मतदार संख्या ३८ हजार ३५९ तर महिला मतदार संख्या ३६ हजार ९९६ आहे. सडक-अर्जुनी तालुका एकूण मतदार संख्या ७९ हजार ६४१ पुरुष मतदार संख्या ४० हजार ८६ तर महिला मतदार संख्या ३९ हजार ५७३ आहे. अर्जुनी-मोरगाव तालुका एकूण मतदार संख्या ९९ हजार ३३५ पुरुष मतदार संख्या ५० हजार ३६० तर महिला मतदार संख्या ४८ हजार ९७५ आहे. गोरेगाव तालुका एकूण मतदार संख्या ९८ हजार १०९ पुरुष मतदार संख्या ४८ हजार ५७६ तर महिला मतदार संख्या ४९ हजार ५३२ आहे.
हेही वाचा - Shivaji Maharaj Statue Defacement : सत्व आणि तत्व आम्ही सोडले...शिवसेनेची भाजपवर टीका