गोंदिया - जिल्ह्यातील मोरगांव-अर्जुनी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग शहारे यांच्या घरी कोणी नसताना आरोपींनी 16 जानेवारीला घरफोडी करत चोरी करून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व एक कलर टीव्ही चोरून नेली होती. मोरगांव अर्जुनी पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले पुरावे तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून 3 आरोपींनी अटक केली आहे.
फरदिन राजीक शेख (रा. वडसा), सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (रा. राजुरा), विकास शर्मा (रा. वडसा) यांचा शोध घेऊन दुर्ग, छत्तीसगढ राज्यातून तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून सर्व सोन्या-चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही देखील हस्तगत केली आहे. जप्त केलेले सोन्या चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही फिर्यादीला परत देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. मोरगांव-अर्जुनी पोलिसांनी शिव जयंती दिवशी फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलून सर्व सोन्या चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. मोरगांव अर्जुनी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.