ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - गोंदिया पोलीस कर्मचारी मृत्यू बातमी

धापेवाडा गट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्तात कर्तव्यावर असलेले दवनीवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई रूपचंद झनकलाल ढोमने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

police-officer-on-duty-in-gram-panchayat-elections-died-by-heart-attack-in-gondi
ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
author img

By

Published : Jan 17, 2021, 5:28 PM IST

गोंदिया - तिरोडा तालुक्यातील धापेवाडा गट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्तात कर्तव्यावर असलेले दवनीवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई रूपचंद झनकलाल ढोमने (57) रा. मुशानी (नवेगाव) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ही घटना 15 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

मतदान प्रक्रिया संपण्यास अर्धा तास आधी मृत्यू -

धापेवाडा गट ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडावी तसेच निवडणुकीदरम्यान गावात सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने ढोमने यांची ड्यूटी धापेवाडा गेटवर लावण्यात आली होती. आपले कर्तव्य पार पाडत असताना मतदान प्रक्रिया संपण्यास अर्धा तास आधी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर लगेच स्थानिक डॉक्टरकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी स्थानिक डॉक्टरांनी त्यांना गोंदियाला नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, गोंदिया येथे आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ढोमने हे माजी सैनिक होते. जूनअखेर त्यांची सेवासमाप्ती होती. त्यांच्या अचानक निधनामुळे दवनीवाडा पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - काँग्रेस-डाव्यांमध्ये कोणताही गैरसमज नाही; बंगाल विधानसभा निवडणूक एकत्रच लढवणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.