ETV Bharat / state

नक्षलग्रस्त गोंदियात तान्हा पोळा उत्साहात; बाल-गोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन - बिस्किट आणि चॉकलेट

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील किशोरी-कणेरी या गावात तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त गावातील चिमुकल्यांनी गर्दी केली होती.

उत्कृष्ट नंदी बैल स्पर्धा
author img

By

Published : Aug 31, 2019, 11:50 PM IST

गोंदिया - श्रावण महिन्याच्या शेवट व भाद्रपद महिनेच्या प्रथमेला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणा निमित्ताने केशोरी-कणेरी या गावामध्ये शेकडोंच्या संख्येने चिमुकले नटून - थटून वेशभूषा करुन मोठ्या उत्साहाने या तान्हा पोळ्यात सहभागी झाले. यामध्ये सहभाग घेतलेल्या चिमुकल्यांना भेट वस्तू व रोख रक्कम देऊन पूरस्कृत करण्यात आले. तसेच बालगोपाळांना बिस्किट आणि चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

बालगोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल आहे. या जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील किशोरी-कणेरी या गावात तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून या निमित्त गावातील चिमुकल्यांनी गर्दी केली होती. तसेच हा उत्सव पाहण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती.

pola-festival
उत्कृष्ट नंदी बैल स्पर्धेचे बक्षिस वितरण

केशोरी गावातील बहुद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 25 वर्षांपासून येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, महात्मा गांधी चौकात तान्ह्यापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात 400 पेक्षा जास्त लहान मुलांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, मुलांनी शेतकरी, राधा, कृष्ण, शंकर, वारकरी अशा विविध प्रकारच्या वेशभुषा करुन तान्हा पोळ्यात सहभाग घेतला. यानंतर या मुलांची आणि त्यांच्या नंदीची संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. दरम्यान, हनुमान मंदिराजवळ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर बहुद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नंदी बैलाला भेट वस्तू व रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच उर्वरित सर्व नंदी बैलाला घेऊन येणार्‍या बाळगोपाळांना बिस्किट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 31 -08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_31.aug.19_tana pola_7204243
ताना पोळ्याला चिमुकल्यांनी चांगलीच गर्दी
बिस्कुट-चॉकलेट देऊन तोंड केला गोड
Anchor:- श्रावण महिन्याच्या शेवट व भाद्रपद माहीनेच्या प्रथमेला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा हा सान मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. याच सना निमित्ताने केशोरी-कणेरी या गावा मध्ये शेकडो च्या संख्येने चिमुकले नटून थटून वेशभूषा धारण करून मोठ्या उत्सहाने या तान्या पोळ्यात सहभागी झाले या मध्ये सहभाग घेतलेल्या चिमुकल्यांना भेट वस्तु व रोख रक्कम देऊन पुरुस्कृत करण्यात आले तसेच बाळगोपाळांना बिस्कुट-चॉकलेट देऊन त्यांचा तोंड गोड ही करण्यात आले.
VO:- गोंदया जिल्हा हा न्क्षल ग्रस्त व आदिवासी बहुल आहे या जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्या तील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील किशोरी-कणेरी या गावात मोठ्या प्रमाणात ताना पोळ्याचा सन मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला असुन या सना निमित्त गावातील शेकडोच्या संखेने चिमुकल्यांच्या गर्दी केली होती. या ताना पोळ्याच्या सना ला पहाण्यासाठी गावातील गावकर्यांनी हि मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पोळा हा सन मोठ्या बैलांचा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ताना पोळा लहान चिमुकल्यांचा असल्यानं लहान चिमुकले हि लाखंडाचे नदी घेऊन हा सन मोठ्या उत्सवात साजरा करतात असाच उत्सव केशोरी गावातील बहूद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 25 वरसा पासून बाल मना वर शेतकरी जीवनाचे प्रतिबिंब उमटवे व शेतकरी बांधवामद्धे एकीची भावना निर्मार्ण व्हावी हा प्रमुखं उद्देशा आहे. महात्मा गांधी चौकात तण्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले. यात 400 बाल गोपालांनी नंदी बैल घेऊन स्वता शेतकरी, राधा, कृष्णा, भगवान शंकर, वारकरी अशा विविध प्रकारच्या वेशभूषया धारण करून तान्हा पोळ्यात सहभागी झाले. संपूर्ण गावातमधून फेरी काढण्यात आली. हनुमान मंदिरं जवळ एकत्र होऊन प्रमुखं अतिथि च्या हस्ते पूजन करून गावकर्‍यांनी पारंपरिक व आधुनिक झडत्या म्हणून त्या काळा वधीत निरिक्षकांनी नंदी बैलाचे निरीक्षण केले. बहूद्देशीय युवा कल्याण मंडळाच्या वतीने उत्कृस्ट नदी बैलाला भेट वस्तु व रोख रक्कम देऊन पुरुस्कृत करण्यात आले. तसेच उर्वरित सर्व नंदी बैलाला घेऊन येणार्‍या बाळगोपाळांना बिस्कुट पाकीट देऊन त्यांचा तोंड गोड करण्यात आला. यावेळी गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्तीत होते
BYTE:- डॉ. अशोक चामट (बहूद्देशीय युवा कल्याण मंडळा,सदस्य)
BYTE:- गुणवंत पेसने (गावकरी) Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.