गोंदिया - तालुक्यातील गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या पैकाटोला येथील शेतकरी गुलाब जीयालाल उके (३५) याचा आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर उलटल्याने मृत्यु झाला आहे.
गुलाब हे ट्रॅक्टर क्र. एमएच ३५/जी. ३७०८ घेउन जात असतांना पैकाटोला शिवारात ट्रॅक्टरवरील नियंत्रण बिघडल्याने ट्रॅक्टर उलटुन त्यांचा मृत्यु झाला. गावाशेजारील जंगल परिसरातून ट्रक्टरने मुरुम आणण्याचे काम सुरू होते.
घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत जेसीबीच्या मदतीने ट्रक्टरचे इंजिन वेगळे करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तपासणीसाठी गोंदिया शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. चिरायु ओमकार बघेले यांच्या तक्रारीवरून गगांगझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.