गोंदिया - वैद्यकीय महाविद्यायातून आज पहाटे दोन महिला रुग्णांना नागपूर पाठविण्यात आले. गोंदियापासून ३० किलोमीटर अंतरावर अॅम्बुलन्समधील ऑक्सिजन संपल्याने एका महिलेचा रस्त्यातच ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेला परत गोंदियात आणून दुसऱ्या अॅम्बुलन्सने नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गोंदिया तालुक्यातील काठी या गावातील एक ४० वर्षीय महिला आणि गोंदिया शहराच्याच्या शास्त्री वार्डात राहणाऱ्या एका महिलेला सोमवारी रात्री अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. दोन्ही महिलांना रात्री गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींची प्रकृती गंभीर असल्याने दोघींनाही एकाच अॅम्बुलन्सने नागपूरला पाठविण्यात आले होते. मात्र, अॅम्बुलन्समधील स्टाफने दोन्ही गंभीर रुग्णांना अॅम्बुलन्सद्वारे नागपुरात नेत असताना अॅम्बुलन्समधील सिलेंडरमध्ये ऑक्सिजनचा किती साठा उपलब्ध आहे, याची खात्री केली नाही. त्यामुळे काही अंतरावर जाताच ऑक्सिजनचा साठा संपल्याने महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला. या संदर्भात गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता विनाराम रुखमोडे यांना विचारणा केली असता या प्रकरणाची चौकशी करून संबंधित असलेल्या दोषी डॉक्टरवर कारवाई करू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या दोन्ही महिलांचे स्लॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सध्या अहवाल प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात नर्सिंग अभ्यासक्रम करत असलेली २२ वर्षीय मुलीचे प्रकृती बारी नसल्याने तिला महाविद्याल दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिक खालावलेली असता तिच्या पालकांनी खासगी नेण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. तिचा देखील तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.