ETV Bharat / state

कंटेनरच्या धडकेत एक पोलीस ठार, एक जखमी - गोंदिया पोलीस मृत्यू न्यूज

गोंदियात कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एक पोलीस शिपाई ठार तर एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना घडली. दोघेही रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काल सायंकाळी दोघेही मोटारसायकलवरून पोलीस मुख्यालयातून रामनगर पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने पोलिसांच्या मोटारसायकलला धडक दिली.

Container
कंटेनर
author img

By

Published : Aug 25, 2020, 4:41 PM IST

गोंदिया - जिल्हा परिषदेसमोर कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एक पोलीस शिपाई ठार तर एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना घडली. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. संदीप खांडेकर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या पोलीस शिपाईचे नाव असून अरुण सोलंके(वय ४०) हे जखमी झाले आहेत.

दोघेही रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काल सायंकाळी दोघेही मोटारसायकलवरून पोलीस मुख्यालयातून रामनगर पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने पोलिसांच्या मोटारसायकलला धडक दिली. या घटनेत मोटरसायकल चालक संदीप खांडेकर कंटेनरच्या मागच्या चाका खाली फेकले गेले व मागे बसलेले अरुण सोलंके मार्गाच्या बाजूला फेकले गेले. संदीप खांडेकर हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे रेफर केले. रस्त्यातच संदीप यांचा मृत्यू झाला.

ग्रामीण पोलिसांनी कंटेनर चालक रामसजिवा विश्वकर्मा (वय ३४, रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.