ETV Bharat / state

गोंदियात भरदिवसा हवेत गोळीबार आणि एकावर चाकू हल्ला; घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण - चाकू हल्ल्यात एक व्यक्ती जखमी

गोंदिया शहरात मंगळवारी चक्रधर बोरकर या व्यक्तीवर चाकूहल्ला झाला. यावेळी आरोपींनी हवेत गोळीबार केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदीत गोळीबाराची घटना घडल्याने पोलिंसाच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

chakradhar borkar
चक्रधर बोरकर
author img

By

Published : May 27, 2020, 1:08 PM IST

गोंदिया- शहरातील शास्त्रीवार्ड परिसरातील मंतर चौक परिसरात राहणाऱ्या व्यक्तीवर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी हवेत गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या मारहाणीत चक्रधर बोरकर वय 45 वर्ष हा व्यक्ती जखमी झाला आहे, त्याच्यावर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चक्रधर बोरकर याच्यावर आरोपींनी देशी कट्टा व चाकुने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळारी दुपारी २ वाजता घडली. बोरकर हा त्याच्या घराच्या परिसरातील दूध डेअरी जवळ बसून होता. बोरकर ज्याठिकाणी बसला होता त्याठिकाणी एका आरोपीने येऊन देशीकट्याने हवेत गोळबीरा केला आणि दुसऱ्या आरोपीने येऊन चाकूने बोरकरच्या पायावर वार करत जखमी केले.

आरोपी टायसन व विनोद जुबेर यांना दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास गोंदिया शहर पोलीस करत असून कोणत्या कारणांनी आरोपींनी हे कृत्य केले आहे याचा शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे करोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना चाकू घेऊन गोंधळ घालणे व गोळीबारसारख्या घटना हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.