गोंदिया - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. आज (दि. ४ ऑगस्ट) गोरेगाव, सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यांत भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून यात्रेचा निषेध नोंदवला.
अर्जुनी मोरगावच्या दिशेने जाताना नवेगाव बांध गावाजवळ मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील दोन गाड्या आपसात धडकल्या होत्या. या घटनेमुळे गाडीचे कगरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.