ETV Bharat / state

गोंदियात ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच डॉ. फुके यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक व स्वातंत्रता सैनानी यांच्यासह इतर सन्माननीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते ध्वजारोहण
author img

By

Published : Aug 15, 2019, 4:39 PM IST

गोंदिया - आज भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच डॉ. फुके यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक व स्वातंत्रता सैनानी यांच्यासह इतर सन्माननीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. फुके यांनी मानवंदना स्वीकारत पोलीस पथकाचे निरीक्षण केले. त्यानंतर आपल्या भाषणातून त्यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

त्यानंतर फुके यांनी जम्मू काश्मीर बद्दल समाचार घेतला. आज काश्मीरमध्ये भारताचे प्रथमच ध्वजारोहण झाले. याचे श्रेय त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिले. तसेच आज भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या प्रसंगी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस शिपायांना पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 15-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_15.aug.19_flag hosting_7204243
७२ व्या वर्धापन दिना गोंदिया प्रथमच पालकमंत्री डॉ. परिणय फुके हस्ते ध्वजारोहण
Anchor:- भारतीय स्वातंत्र्याचा ७२ व्या वर्धापन दिना गोंदिया जिल्ह्यात देखील मोठ्या थाटात साजरा करण्यात आला असून गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मानवंदना स्वीकारली यावेळी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक व स्वातंत्र सैनानी सह सन्माननीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर पालकमंत्री यांनी मानवंदना स्वीकारीत पोलीस पथकाचे निरीक्षण केले तर त्यांनी आपल्या भाषणातून गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली तर, जम्मू काश्मीर मुद्दावर त्यांनी बोलताना आज काश्मीर मध्ये भारताचं ध्वजाचे प्रथमच ध्वजारोहण झाल्यामुळे याचे श्रेय देशाचे प्रतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित सहा यांना जात असून आज भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले तर या प्रसंगी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस शिपायांना पदक देऊन हि सन्मान करण्यात आला.
BYTE:- डॉ. परिणय फुके ( पालकमंत्री गोंदिया-भंडारा )Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.