गोंदिया - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे निवडणूक लढवणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
पंचबुद्धे २००४ मध्ये भंडारा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. २००४ च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते शेवटचे ६ महिने शिक्षण राज्यमंत्री होते. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धेंचा प्रवास आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले. तर याच काळात ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पंचबुद्धे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून या ते या क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत होते. सध्या ते राष्ट्रवादी पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत.