ETV Bharat / state

गोंदियातील नरभक्षक एन-वन वाघिण अखेर जेरबंद - Tigress Caught in gondia

गोंदिया जिल्ह्यात धुमाकुळ घातलेल्या नरभक्ष वाघिणीला जेरबंद करण्यात अखरे वन विभागाला यश आले आहे. या वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यु सेंटरमध्ये नेण्यात आले आहे.

N ONE Tigress Caught in gondia
गोंदियातील नरभक्षक एन-वन वाघिण जेरबंद
author img

By

Published : May 8, 2020, 1:32 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील गोरेगाव आणि तिरोडा या दोन तालुक्यात मागील दोन महिन्यामध्ये एका नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. मोह फुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिला आणि पुरुषाला या वाघिणीने ठार केले होते. या वाघिणीचा वाढता धुमाकुळ लक्षात घेता तिला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात वनविभागाकडून देण्यात आले होते.

नरभक्षक वाघिणाला जेरबंद केल्यानंतर याबद्दल माहिती देताना गावकरी..

हेही वाचा... यवतमाळमध्ये चारशे महिला पोलीस कर्मचारी बनल्या आहेत कोरोनाविरोधातील ढाल !

या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैधकीय अधिकारी आणि पथक गोंदिया वनविभागाच्या पथकासह दोन्ही तालुक्यात मागील आठ दिवसांपासुन काम करत होते. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी त्यांनी शोध मोहिम राबवली होती. त्यावेळी ही वाघिण काल(गुरुवार) गोरेगाव तालुक्यातील बागळबंध येथील नवरगाव तलाव परिसरात आढळली. यानंकतर पथकाने या वाघिणीला सायंकाळी 5 वाजता रेस्क्यु करत जेरबंद केले.

वाघिणीला पकडल्यानंतर नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. या वाघिणीचे नाव 'वाघ मादी N-1' असल्याचे वनविभाने स्पष्ट केले आहे. आज या वाघिणीची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अखेर या नरभक्षक वाघिणीला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.