ETV Bharat / state

वीज बिल वसुलीवेळी गैरवर्तणुकीचा ग्राहकांचा आरोप - गोंदिया ब्रेकिंग न्यूज

गोंदियात महावितरणाचे कर्मचारी वीज बिल वसुली करताना ग्राहकांशी गैरवर्तणूक करत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.

Gondia
गोंदिया
author img

By

Published : Mar 29, 2021, 7:32 PM IST

गोंदिया : महावितरणाकडून 31 मार्चच्या अगोदर वीज बिल वसुल करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. महावितरणाचे काही कर्मचारी वसुली दरम्यान गैरवर्तणूक करत असल्याचा तसेच धमकी सुद्धा देत असल्याचा आरोप गोंदियातील ग्राहकांकडून केला जात आहे.

वीज ग्राहक प्रदिप

वीज ग्राहकांचा आरोप

गोंदिया शहरातील यादव चौक परिसरात राहणाऱ्या प्रदीप गोविंदराम असरानी यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी आले तेव्हा जुन्या बिलासोबत नवीन बिल देण्यात यावे अशी विनंती आपण केली. मात्र, वसुली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी काहीही न ऐकता पहिले बिल द्या अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कापू असे म्हणत गैरवर्तणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप प्रदीप यांनी केला.

नगरसेवकाचाही आरोप

प्रदिप यांनी याबाबतची माहिती नगरसेवक लोकेश यादव यांना दिली. यावेळी लोकेश यांनीही महावितरण कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणुकीचा आरोप केला. अशा प्रकारे वसुली करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ग्राहकांना वीज बिल भरण्याची काही दिवसाची सूट द्यावी

वीज ग्राहकांशी अभद्र वागणे योग्य नव्हे -

महावितरणच्या या प्रकारच्या वसुलीमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज बिलाची मागणी करा ते योग्य आहे. पण सामान्य ग्राहकांसोबत गैरवर्तणूक केली जाऊ नये अशी मागणी यादव यांनी केली आहे. यादव चौक क्षेत्र वासियांनी 90 टक्के बिलाची रक्कम पूर्ण भरली आहे. तर काही ग्राहकांना वीज बिल भरण्याची काही दिवसाचींची मुदत दिली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया

हेही वाचा - बाळ बोठेला पुन्हा पोलीस कोठडी, सलग तिसऱ्या गुन्ह्यात चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.