ETV Bharat / state

लग्नासाठी आलेल्या आईसह दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू - गोंदिया मृत्यू

जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या माय-लेकरांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

gondia death
लग्नासाठी आलेल्या आईसह दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
author img

By

Published : Mar 4, 2020, 7:02 PM IST

Updated : Mar 4, 2020, 11:58 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या माय-लेकरांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये आई आणि तिच्या 2 मुलांचा समावेश असून ते नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नासाठी आलेल्या आईसह दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

हेही वाचा - निर्भया प्रकरण : उद्या जाहीर होणार दोषींच्या फाशीची नवी तारीख..?

आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे ही घटना घडली. आईसह दोघे मुलगा आणि मुलगी तलावावर शौचासाठी गेली असता पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले असून गावातील मच्छीमारांच्या सहकार्याने तिघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा केला आहे.

मृतामध्ये आई मुक्ता पटले (वय-35), मुलगा आदित्य पटले (वय-13), मुलगी काजल पटले (वय-10) आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या बोरकन्हार येथील शरणागत यांचेकडील एका लग्न समारंभात नागपुर येथील पटले कुटुंबातील तिघे मायलेकरे आले होते. दरम्यान, सायंकाळी आदीत्यला शौच लागल्याने त्याच्या आईने बोरकन्हारच्या नौताड्या तलावावर नेले होते. दरम्यान, आदित्य हा तलावात बुडताना पाहून त्याची आई मुक्ता ही तलावात मुलाचा जीव वाचविण्यासाठी उतरली. मात्र, तीसुद्धा पाण्यात बुडाली आई व भावाला पाण्यात बुडतांना पाहून मुलगी काजल पटले ही सुद्धा तलावात उतरली असता तिचाही पाण्यात बुडून दुदैवी अंत झाला. या हृदद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - भाजपचं ऑपरेशन लोटस फसलं? चार आमदार विशेष विमानानं भोपाळमध्ये दाखल

Last Updated : Mar 4, 2020, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.