नागपूर - विधानसभेचे हिवाळी नागपुरात सुरू आहे. यावेळी गोंदिया शहराचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील परिस्थिती मांडून ढासळत्या कायदा व्यवस्थेबाबतचा प्रश्न उपस्थित केला.
गोंदिया शहारापासून 5 किलोमीटर अंतरावर एका दलित तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेकडे गोंदिया शहराचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत सभागृहाचे लक्ष वेधले आहे. २ दिवसांपूर्वी सुद्धा एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याशिवाय महिनाभरापूर्वी सुद्धा २ अल्पवयीन तरुणांनी एका अल्पवयीन तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली होती. शहरात रेती माफिया आणि भू माफियांची दहशत असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले, असल्याचे आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले.
हेही वाचा - गोंदियात खंडणीसाठी आतेभावाने केली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची हत्या
तसेच, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी, हत्या, अॅसिड हल्ला सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि कायदा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा - गोंदियात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अॅसिड हल्ला, दोन आरोपी गजाआड